शारदा पीठ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट शारदा पीठ हे एक हिंदू मंदिर आणि शारदा (सरस्वती) या हिंदू देवीला समर्पित शिकण्याचे प्राचीन केंद्र आहे. हे मध्ययुगातील काश्मीरमधील भारतीय उपखंडातील अग्रगण्य मंदिर विद्यापीठांपैकी एक होते. हे ठिकाणपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आद्य शंकराचार्यांसारख्या विद्वानांनी येथे भेट दिली होती. उत्तर भारतातील शारदा लिपीच्या विकासात आणि लोकप्रियतेत या शिक्षणाचे केंद्र असलेल्या पीठाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे काश्मीरला काहीवेळा "शारदा देश" म्हणून संबोधले जाई.

अठरा महाशक्ती पीठांपैकी शारदा पीठ हे एक आहे. येथे देवी सतीचा उजव्या हात खाली पडल्याची आख्यायिका आहे. शारदा पीठ, मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ मंदिर ही काश्मिरी पंडितांची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत.

काश्मिरी पंडित संघटनेने आणि जम्मू-काश्मीरमधील नेत्यांनी भारत आणि पाकिस्तान सरकारांना सीमावर्ती तीर्थयात्रे सुलभ करण्यासाठी उद्युक्त केले आहे.. ज्येष्ठ भारतीय राजकारण्यांनीही पाकिस्तानला या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये या विषयावर द्विपक्षीय चर्चा होते.[१][२] पाकिस्तान सरकार हे भारतीय यात्रेकरूंसाठी कॉरिडॉरच्या संभाव्यतेचा शोध घेत आहे, आणि ही योजना मंजूर होण्याच्या शक्यता आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी २०१९ सालच्या मार्चमध्ये दिले होते.[३] तथापि, त्यानंतर पाकिस्तान सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही.[४]

इतिहास

शारदा पीठाची उत्पत्ती अनिश्चित आहे. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हे कुषाण साम्राज्याखाली (इ.स. ३० - इ.स. २३०) बांधले गेले. इतरांचा असा विश्वास आहे की शारदा पीठ आणि मार्तंड सूर्य मंदिर यांच्यातील समानतेमुळे हे कार्कोट साम्राज्याचा पाचवा राजा ललितादित्य (ख्रिस्तपूर्व इ.स. ७२४ - ख्रिस्तपूर्व इ.स. ७६०) यांने बनवले आहे. दुसऱ्या एका मतानुसार की हे शारदा पीठ एकाच काळात नव्हे तर टप्प्याटप्प्यात तयार केले गेले होते, असे सूचित होते. हे मत असलेले काही अनुयायी असा मानतात की शारदा पीठ पहिल्यांंदा ५,००० वर्षांपूर्वी (ही वर्षे केव्हापासून मोजायची?) बांधले गेले.

शारदा पीठाचे सर्वात प्राचीन संदर्भ इ.स. ६वे ते ८वे शतक या काळात लिहिलेल्या नीलमत पुराणात सापडतात. १०व्या शतकात, स्थानिक लोक आणि यात्रेकरू पूजा करत असलेल्या मंदिराचे वर्णन अल बिरूनी करतो. त्यावेळच्या मुलतान सूर्य मंदिर आणि सोरटी सोमनाथ मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरांसमवेत त्यांनी त्याचे वर्णन केले आहे. हे असे सुचवते की त्या काळात शारदा पीठ भारतातील सर्वात पूजनीय स्थळांपैकी एक होते.

स्थान

शारदा पीठ हे पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपासून अंदाजे १५० किलोमीटर अंतरावर आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून हे १३० किलोमीटर अंतरावर आहे. हे युद्ध नियंत्रण रेषेपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे. त्या मुळे या ठिकाणाचे पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व कमी झाले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १९८१ मीटर उंचीवर आहे.

चित्र दालन

साचा:चित्र दालन

संदर्भ

साचा:संदर्भयादी