शाह मीर घराणे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

शाह मीर घराणे हे भारतातील काश्मीरवर राज्य करणारा मुस्लिम वंश होता.[१] इ.स. १३३९ ते १५६१ या राजवटीच्या कारकिर्दीत काश्मीरमध्ये इस्लाम धर्माची ठामपणे स्थापना झाली.

मूळ

शाह मीर यांनी इ.स. १३३९ मध्ये या राजघराण्याची स्थापना केली होती. शाह मीरच्या उत्पत्तीसंदर्भात दोन सिद्धांत आहेत. इतिहासकार ए. क्यू. रफीकी म्हणातात की काश्मीरच्या पर्शियन इतिहासात शाह मीर हा स्वातच्या राज्यकर्त्यांचा वंशज आहे. रफीकी म्हणातात की मीर हे बहुदा स्वात तेथील तुर्की किंवा पर्शियन स्थलांतरितांचा वंशज आहे, ज्याने स्थानिक स्वदेशी लोकांशी विवाह केले असेल. मीर सय्यद अली हमदानी या पर्शियन सूफी संतासोबत काश्मिरातील कुब्रवीया जमातीतील शाह मीर असावा अशी शक्यता आहे.

दुसरीकडे, १५व्या शतकातील काश्मिरी इतिहासकार जोनाराजा असे लिहितात की शाह मीरचे वंशज आपल्या जमातीसमवेत पंचगहवारा (ज्याला राजौरी आणि बुढाल यांच्यातील पंजगबब्बर दरी म्हणून ओळखले जाते) येथून काश्मीरला आले. जोनाराजा हे शाह मीरच्या वंशज झैन-उल-अबिदिनच्या दरबारात होते. असेही म्हणतात की पंजगब्बर दरी खासा जमातीनी वसवली होती आणी म्हणून शाह मीरला खासा पण संबोधले जाते.[२][३][४][५][६]

हिंदूविरोध

शाह मीर यांनी काश्मीरमध्ये इस्लाम प्रस्थापित करण्याचे काम केले आणि त्याचे वंशज राज्यकर्ते, खासकरून सहावा शासक सिकंदर बुत्शिकन, यांनी सहाय्य केले. त्यांने इ.स. १३३९ ते १३४२ राज्य केले. त्याच्यामागे त्याचे दोन मुलं, जमशेद आणि अलाउद्दीन, हे अनुक्रमे राजे झाले. अलाउद्दीनने स्वताच्या भावाला पराभूत करून राज्य ताब्यात घेतले. पुढे जाउन अलाउद्दीनच्या दोन मुलांनी राज्य केले; अनुक्रमे शिहाबुद्दीन आणि कुतुबुद्दीन.

सहावा सुलतान सिकंदर बुत्शिकन हा काश्मिरच्या हिंदूंना बळजबरीने इस्लाममध्ये रूपांतरित करण्याच्या त्यांच्या कठोर प्रयत्नांसाठी कुख्यात आहे. त्याच्या कारकिर्दीत हिंदूंनी मोठ्या संख्येने धर्मांतर केले, पलायन केले किंवा मारले गेले. सिकंदर बुत्शिकनचे खरे नाव सिकंदर शाह मीरी असे होते. पण त्याला "बुत्शिकन" असे संबोधले जाऊ लागले. (बुत + शीकन म्हणजे बुत किंवा मूर्ती तोडणारा). त्याने हिंदू आणि बौद्धांची असंख्य मंदिरे, चैत्य, विहार, तीर्थे, धार्मिक स्थळे आणि इतर पवित्र स्थळे नष्ट केली. त्याने नृत्य, नाटक, संगीत, मूर्तिचित्रण आणि हिंदू आणि बौद्धांच्या अशा धार्मिक, सांस्कृतिक किंवा सौंदर्यविषयक उपक्रमांवर बंदी घातली. त्याने हिंदूंना त्यांच्या कपाळावर टिळा लावण्यास मनाई केली. त्याने त्यांना प्रार्थना आणि उपासना करण्याची, शंख फुंकण्याची किंवा घंटा वाजवीण्याची परवानगी दिली नाही. मुस्लिम जिल्ह्यात बिगर मुसलमानांना कर भरायला लावणारा जिझिया हा कर लागू करण्यात आला आणि आकारणी ही वार्षिक चार तोळे चांदीचा कर भरायचा होता.[७][८]

संदर्भ

साचा:संदर्भयादी