शिरवळ लेणी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे.[१]

यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत.

शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून जवळच पांडवदरा नावाची दुर्लक्षित बौद्ध लेणी आहेत.याच परिसरात पुणे-बंगळूर महामार्गानजीक शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाच्या दक्षिणेस सुमारे दोन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत पांडवदरा शिवारात पुरातन लेणी आहे. पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना या डोंगर रांगेतील काळा पाषाण खोदून अनेक गुहा तयार करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता, आशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते. वास्तविक ही बौद्ध लेणी आहेत.

रचना

डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला 'दगोबा' किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा स्वरूपाची बैठक व्यवस्था केलेली आहे. शेजारील लेणीत पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर कोपऱ्यातील लेण्यांत छोटेसे मंदिर असून त्याच्या वरील बाजूस एक लेणी असून त्यातही पाणी असते. साचा:संदर्भनोंदी साचा:महाराष्ट्रातील लेणीसाचा:भारतीय बौद्ध लेणी