शिवनेरी लेणी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्लावरील ही शिवनेरी लेणी आहेत. ह्यांत सुमारे ८४ लेण्यांचे खोदकाम आहे.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा आहे, पण तेथील लेणी नाहीत. . या शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत. भारतातील सर्वात जास्त लेणी महाराष्ट्रात आहेत,आणि त्यंतली बहुसंख्य एकट्या जुन्नर तालुक्यामधे आहेत. शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी पहायला मिळतात.

महाराष्ट्रातून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात परंतु खूप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळदंड़ाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात. या मार्गावर काही लेणी आहेत.

शिवनेरी किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या साखळदंडाजवळची लेणी :
साधारणता तासाची चढाई केल्यावर माणूस साखळदंड आहे त्या ठिकाणी येऊन पोहचतो. वर जाण्यासाठी खालच्या बाजूस ज्या मार्गावर साखळदंड आहे, त्या मार्गावर दिशादर्शक बाण दाखवले आहेत. त्या तिथे एक मोठा लेणी समूह आहे. शिवनेरी गडावर वरती ज्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात, त्याचप्रमाणे या लेण्यांच्या समोरच एक पाण्याची टाकी कोरलेली आहे. उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यांमधे मुबलक प्रमाणात पाणी असते. यावरून त्याकाळातील जलव्यवस्थापन हे किती उत्तम होते याची जाणीव होते. या टाक्याजवलच एक सुंदर लेणे आहे,. लेण्याच्या दारावर सुंदर असे नक्षी काम कोरलेले आहे.

लेण्यामधे बौद्ध भिक्खूंना साधना करता यावी यासाठी शैलगृहे आहेत. लेण्याच्या दाराच्या बाजूला अप्रतिम अशी खिड़की कोरलेली आहे. बेडसे लेण्यांमध्ये पण अशीच सुंदर खिड़की पहायला मिळते. या लेणी समुहातील बहुतेक लेणी या अर्धवट कोरलेली दिसतात. या लेण्याच्या खालच्या बाजूने पुढे पायवाटेने १५ मिनिटे चालत गेल्यावर दुसरा एक मोठा लेणी समूह बघण्यास मिळतो. या लेण्यांमधे एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजूला खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेश द्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेण्याच्या उजव्या बाजुच्या भिंतीवर पाली भाषेच्या धम्मलिपीतील एक शिलालेख कोरलेला आहे. या लेणी साठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे.

लेणी प्रवेशद्वारा समोरच्या छताला दोन हजार वर्षां पुर्वीचे रंगकाम केलेले आढळते.आज ते रंगकाम शेवटची घटका मोजत आहेत परंतु जेवढे शिल्लक आहे ते ज्या वेळेस आपण पाहतो तर असे वाटते की आताच कोणि तरी काचेवर रंग काम केले आहे एवढी चकाकी आजही त्या कलेत दिसते. विचार मनात येतो की ज्या वेळेस ते रंगकाम केले गेले असेल त्याचे सौंदर्य किती अप्रतिम असेल.चैत्यगृहा मधे प्रवेश केल्यावर चार खांब दिसतात. आत मधे एक भव्य असा परिपुर्ण चैत्यस्तुप दिसतो,हे चैत्यगृह चौकोनी आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेले होते,आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे.याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तुपाचा आकार हा खुप भव्य आहे. या स्तुपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोड़लेली आहे.या स्तुपाची पुजा जेव्हा बौद्ध भीक्खु आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खुप धम्ममय होत असेल यात शंका नाही. बुद्ध स्तुपाच्या सानिध्यात एक विलक्षण शांती अनुभवयास मिळते.या चैत्यगृहा समोर पाहिले असता विस्तीर्ण असा जुन्नरचा परिसर दृष्टीक्षेपात पडतो.अंबा अंबिका लेणी समुह सुद्धा याठीकाना वरून दिसतो. वंदामी चेतियं सब्ब सब्ब ठानेसु पतीठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल सदा. हे चैत्य स्तुपाचे सुर हजारो वर्ष या लेणींमधुन दुमदुमत असतील आणि संपूर्ण भुतलावरील प्राणी हर्षाने उल्हासित होत असतील यात तीळ मात्र शंका नाही. यातील दक्षिण गटात २३, पूर्व गटात ५५ तर पश्चिम गटात ६ लेणी आहेत. याशिवाय या लेण्यांच्या अवतीभोवती पाण्याची ६० कुंडे आणि पुन्हा या साऱ्यांवर धम्मलिपीतील तब्बल नऊ शिलालेख आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात.शिलालेख संपादन करा ‘यवणस चिटस गतानं भोजण मटपो देयधम सघे’ याचा अर्थ असा की, गता देशाचा यवन (ग्रीक) चित (चैत्र) याने या संघास हा भोजनमंडप दान दिला आहे.

शिलालेख ‘यवणस चिटस गतानं भोजण मटपो देयधम सघे’ याचा अर्थ असा की, गता देशाचा यवन (ग्रीक) चित (चैत्र) याने या संघास हा भोजनमंडप दान दिला आहे.

या चैत्यगृहाच्या बाजुला शैलगृह कोरलेले आहेत.यात दर्शनी भिंतीवर स्तुप कोरलेला आहे याच्या छतालाही रंगकाम केलेल्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात. या लेणीच्या बाजुला काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात ज्या प्रमाणे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्या साठी जीना असतो त्याच प्रमाणे एक जीना कोरलेला दिसतो या जिन्यातुन वरती गेल्यावर आपल्याला एक भव्य लेणी दिसते या लेणीला व्हरंडा आहे दुमजली असलेल्या या लेणी मधुन समोरचे दृश्य अप्रतिम दिसते. सम्राट अशोक यांनी बुद्ध अस्थि धातुंवर संपूर्ण जंबुद्वीपात ८४००० स्तुप बांधले.स्तुप हे बुद्ध प्रतीक आहे. बुद्ध प्रतीक पुढील प्रमाने होत बोधिवृक्ष,सिरिपाद,स्तुप. बोधिवृक्ष आपल्याला अंबाअंबिका लेणी समुहातिल भुत लेणीच्या प्रवेशद्वारा वर कोरलेले दिसते,तसेच बुद्ध,धम्म,संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्धा भुत लेणी मध्ये, अंबा अंबिका लेणी मधे कोरलेल्या शिलालेखाच्या सुरुवातीला तसेच लेन्याद्रिच्या मुख्य स्तुपाच्या हर्मिकेवर कोरलेले आपल्याला पहायला भेटते. एवढ्या विपुल प्रमाणात जुन्नर मधे लेणी आहेत की यावरून आपन हा अनुमान लावतो की दोन हजार वर्षांपुर्वी किती विपुल प्रमाणात भिक्खु संघ येथे वास्तव्य करत असेल आणि त्यांना दान देणारे उपासकही येथे मोठ्या प्रमाणात असतील. संपूर्ण जंबुद्वीपावर बुद्धांच्या धम्माचे राज होते हे आपल्याला ठाउक आहे. बुद्धं सरणं गच्छामि धम्मं सरणं गच्छामि संघं सरणं गच्छामि हा ध्वनि हजारो वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दुमदुमत असेल. लाखो अनुयायी बुद्धाने सांगितलेल्या धम्म मार्गावर आपले जीवन व्यतीत करत आले आहेत. हा बुद्धांचा धम्म जनमाणसा पर्यंत पोहचवन्याचे प्रमुख केंद्र या लेणी होत्या. हजारो वर्षां पासुन या बुद्धाच्या भारत भुमिला भेट देण्यासाठी अनेक राजे,उपासक येत होते,येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील.

अशी ही अप्रतिम जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरील लेणी पाहण्यासाठी माझ्या सोबत माझे जवळचे मित्र डॉ.संदिप रोहकले,संदिप लेंडे आणि निखिल बारभाई उपस्थित होते.आपणही जुन्नरला शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी कधी आलात तर या लेणीला आवश्य भेट द्या.

लेणी

इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात हे लेणे निर्माण झाले.

स्वरूप

यातील दक्षिण गटात २३, पूर्व गटात ५५ तर पश्चिम गटात ६ लेणी आहेत. याशिवाय या लेण्यांच्या अवतीभोवती पाण्याची ६० कुंडे आणि पुन्हा या साऱ्यांवर ब्राह्मी लिपीतील तब्बल नऊ शिलालेख आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात.

शिलालेख

‘यवणस चिटस गतानं भोजण मटपो देयधम सघे’ याचा अर्थ असा की, गता देशाचा यवन (ग्रीक) चित (चैत्र) याने या संघास हा भोजनमंडप दान दिला आहे.

बाह्य दुवे

हेही पहा

साचा:विस्तार साचा:संदर्भनोंदी साचा:भारतीय बौद्ध लेणी साचा:महाराष्ट्रातील लेणी