शिवाजी महाराजांची राजमुद्रा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:संदर्भहीन लेख

छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे -

  • संस्कृत :

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

  • अन्वय :

प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता
शाहसूनः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते

  • मराठी अर्थ :
  1. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
  1. प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.
  • Romanization :

"Pratipchandralekhev Vardhishnurvishwavandita Shahasuno Shivsyaesha Mudra Bhadray Rajate"

  • इंग्रजी :

The glory of this Mudra (seal) of Shahaji’s son Shivaji will grow like the moon from New Moon Day. It will be respected across the world & it will shine only in the service of people.