शीला भाटिया

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट शीला भाटिया (१ मार्च १९१६ - १७ फेब्रुवारी २००८) ह्या भारतीय कवयित्री, नाटककार, आणि भारतीय कलाप्रकारांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथील दिल्ली आर्ट थिएटरच्या संस्थापक होत्या.[१][२] त्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाशी पण संबंधीत होत्या.[३][४] पंजाबी ओपेरा, एक भारतीय नृत्य नाटकाचा प्रकार आहे ज्यामध्ये ओपेरा सारख्या हालचालींचा समावेश होतो. १९५० व १९६० च्या दशकात हा शिला भाटिया यांनी निर्माण व प्रसिद्ध केला आहे.[५][६][७][८]

हिंदी आणि उर्दू नाटकांसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले. १९७१ मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री, या चौथ्या भारतीय नागरी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.[९] एका दशकानंतर त्यांना १९८२ मध्ये नाटक दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला.[१०] त्यानंतर १९९७ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार मिळाला.[११]

चरित्र

शीला भाटिया यांचा जन्म १ मार्च १९१६ रोजी ब्रिटिश भारतातील सियालकोट येथे झाला होता जे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे.[५][११] बीए पदवी मिळविल्यानंतर त्यांनी शिक्षण (बीटी) मध्ये पदवी संपादन केली आणि लाहोरमध्ये गणिताच्या शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी नंतर स्वतःला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील केले सामील केले.[४] अभिनय विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्येही काम केले.

भाटियाची पहिली निर्मिती कॉल ऑफ द व्हॅली हे संगीत नाटक होते जे विभाजनाच्या आधिच्या काश्मीरमधील जीवनाचे चित्रण करत होते.[४][५][१२] त्यानंतर हीर रांझा (१९५७), दर्द आएगा दाबे पाव (१९७९), सुलगदा दर्या (१९८२), ओमार खय्याम (१९९०), नसीब (१९९७), गालिब कौन था (१९७२), किस्सा यह औरत का (१९७२), हवा से हिप्पी तक (१९७२) आणि उर्दूतील ये इश्क नहीं आसन (१९८०), अशा ६०हून अधिक निर्मीत्या त्यांनी केल्या आहेत. सुलगदा दर्या या नाटकात त्यांनी सूफी कवी बुल्ले शाहच्या कवीता वापरल्या आहेत.[१३] नाटकांकरिता त्यांनी इंग्लंड, पोलंड, रुसिया, चेकोस्लोवाकिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथेही प्रवास केला होता.[११][१][१४][१२] फैज अहमद फैज या प्रसिद्ध कवीच्या त्या अनुयायी असून, भाटिया यांनी पार्लो दा झक्कर (१९५०) या सारखे काव्यसंग्रह व काव्याशास्त्रावर १० प्रकाशनेही केली आहेत.[१५][१३] कालांतराने दिल्ली आर्ट थिएटर बंद पडले कारण त्यास योग्य निधी उपल्बध होउ शकला नाही व कलाकारांचा रोख दूरचित्रवाणी कडे वळला होता.

शीला भाटिया यांचे १७ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.[५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी