श्रीराम लागू

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट अभिनेता डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९)[१] हे मराठीहिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेतेदिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.[२]

सुरुवातीचे जीवन

श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

कारकीर्द

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[३] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[४]

धर्म

श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[५] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.

ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.[६] ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. [७]

चित्रपट

साचा:Div col

साचा:Div col end

नाटके

श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव) साचा:Div col

  • अग्निपंख (रावसाहेब)
  • अँटिगनी (क्रेयाँ)
  • आकाश पेलताना (दाजीसाहेब)
  • आत्मकथा (राजाध्यक्ष)
  • आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
  • आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
  • इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
  • उद्याचा संसार (विश्राम)
  • उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • एक होती राणी (जनरल भंडारी)
  • कन्यादान (नाथ देवळालीकर)
  • कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
  • काचेचा चंद्र (बाबुराव)
  • किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
  • खून पहावा करून (आप्पा)
  • गार्बो (पॅन्सी)
  • गिधाडे (रमाकांत)
  • गुरू महाराज गुरू (गुरुनाथ)
  • चंद्र आहे साक्षीला
  • चाणक्य विष्णूगुप्त (चाणक्य)
  • जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
  • डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
  • दुभंग
  • दूरचे दिवे (सदानंद)
  • देवांचे मनोराज्य (विष्णू)
  • नटसम्राट (बेलवलकर)
  • पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रतिमा (चर्मकार)
  • प्रेमाची गोष्ट (के. बी.)
  • बहुरूपी
  • बेबंदशाही (संभाजी)
  • मादी
  • मित्र
  • मी जिंकलो मी हरलो (माधव)
  • मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
  • यशोदा (अण्णा खोत)
  • राजमुकुट (राजेश्वर)
  • राव जगदेव मार्तंड (जगदेव)
  • लग्नाची बेडी (कांचन)
  • वंदे मातरम्‌ (त्रिभुवन)
  • वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
  • शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
  • सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
  • सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
  • हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
  • क्षितिजापर्यंत समुद्र

साचा:Div col end

पुस्तके

  • झाकोळ (पटकथा)
  • डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.

"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.

पहा

पुरस्कार

तन्वीर सन्मान

श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.

  • २०१३ सालचे पुरस्कारार्थी
    • तन्वीर पुरस्कार : गो.पु. देशपांडे (मरणोत्तर) यांना
    • तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यनिर्माते वामन पंडित यांना
  • २०१७ सालचे पुरस्कार
    • तन्वीर पुरस्कार : नाटककार सतीश आळेकर यांना
    • तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : मुंबई येथील फॅटस थिएटरची संस्थापक फैजे जलाली यांना

साचा:विकिक्वोटविहार

संदर्भ

बाह्य दुवे