श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२१-२२

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. जानेवारी मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी२० मालिका कसोटी मालिकेपूर्वी खेळवण्यात यावी अशी विनंती बीसीसीआयकडे केली. त्यानुसार बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जारी केले ज्यात ट्वेंटी२० मालिका फेब्रुवारीपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले. बंगळूर येथील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र खेळवण्यात आली.

भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. पहिल्या कसोटीसाठी ५०% प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. मोहाली येथील पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना होता. रविंद्र जडेजा याच्या नाबाद १७५ धावांच्या आणि ९ गडी मिळवून केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने पहिला कसोटी सामना १ डाव आणि २२२ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. बंगळूर येथील दुसरी कसोटीत २३८ धावांनी विजय मिळवत भारताने कसोटी मालिका २-० ने जिंकली. दौऱ्यानंतर श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज सुरंगा लकमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

साचा:श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१-२२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे