संघमित्रा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:थेरवाद बौद्ध धर्म

संघमित्रा (पाली: संघमित्ता) (इ.स.पू. २८१इ.स.पू. २९२) ह्या सम्राट अशोक आणि त्यांची बौद्ध धर्मीय राणी देवी यांची मुलगी व एक अरहंत पद प्राप्त भिक्खुणी होत्या. महेंद्र या आपल्या भावासोबतच त्यांनीही मठवासी बौद्ध भिक्खुणींचे अनुयायीत्व पत्करले होते. पुढे बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे श्रीलंकेत गेली. श्रीलंकेत त्यांच्या बरोबर इतर भिक्खूणींनाही पाठवण्यात आलं.

अशोकांच्या बौद्ध धर्मीय पत्नीला आपल्या मुलीचे नाव बौद्ध धर्माशी निगडितच असावं असं वाटतं होतं आणि म्हणून तिने या मुलीचे नाव ‘संघमित्रा’ असं ठेवलं होतं. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकांनी जेव्हा आपल्या पत्नीसह बौद्ध धर्म स्विकारला तेव्हाच त्यांनी असा निर्णय घेतला होता की, गौतम बुद्धांची शिकवण आणि तत्त्वे यांचा प्रसार करण्यासाठी, प्रवचनांच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःच्या मुलांना आपल्यापासून दूर परप्रांतात पाठवायचे आणि त्यांनी हा निर्णय आमलात आणला. प्रत्येक हिवाळ्यातला सर्वात लहान दिवस, संघमित्राच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

हे ही पहा