संघमित्रा मौर्य

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

संघमित्रा मौर्य (जन्म ३ जानेवारी १९८५) एक भारतीय राजकारणी आणि १७व्या लोकसभेचे सदस्या आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यादव यांचा पराभव करून, भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून उत्तर प्रदेशमधील बदायूंमधून भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात लोकसभेवर निवडून गेल्या.[१] यापूर्वी तिने इ.स. २०१४ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या सदस्य म्हणून मैनपुरी येथे निवडणूक लढविली होती पण मुलायमसिंह यादव यांच्याकडून त्या पराभूत झाल्या होत्या.[२] [३]

वैयक्तिक जीवन

मौर्य यांचा जन्म ३ जानेवारी १९८५ रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहरात राजकारणी स्वामी प्रसाद मौर्य आणि शिव मौर्य यांच्या घरात झाला. त्या बौद्ध धर्माची उपासक आहेत.[४] त्यांच्या कुटुंबाने हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला.[५] त्यांनी एआरएच्या लखनऊ मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.[६] त्यांचे पती नवल किशोर शाक्य यांनी २०१८ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला.[७] त्यांना एक मुलगा आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी