प्रयागराज

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
प्रयागराज येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य

प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहेसाचा:संदर्भ हवा. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना सरस्वती नदीसुद्धा येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयागराज एक असून, हरिद्वार, उज्जैननाशिक - त्र्यंबकेश्वर ही अन्य क्षेत्रे आहेत.

इतिहास

प्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासिक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. मुघलांनी याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबादहून प्रयागराज केले [१] .

१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलिसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. गंगा, यमुनासरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

बाह्य दुवे

साचा:Authority control