सरस्वती-पूजन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
सरस्वती पूजन

सरस्वती पूजन हा एक हिंदू धार्मिक आचार आहे.वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन दिवशी सरस्वती पूजन केले जाते.[१] उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते.[२][३]

स्वरूप

दस-याच्या दिवशी लहान मुले शाळेत अथवा घरात अभ्यासाच्या पाटीवर सरस्वतीचे प्रतीकरूप चित्र काढतात. झेंडूची फुले वाहून, उदबत्ती ओवाळून त्याची पूजा करतात. अभ्यासाची पुस्तके, ग्रंथ यांचेही पूजन या दिवशी केले जाते.[३] वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांचा शाळेत प्रवेश होतो आणि अक्षर ओळख करून देत त्यांची अभ्यासाची सुरुवात या दिवशी होते.[४]

Saraswati Print

सरस्वतीपूजन

सरस्वती (बुद्धि) स्तोत्र

हेदेखील पाहा

वैदिक प्रतीक-दर्शन

वसंत पंचमी

विजयादशमी

संदर्भ