सवतसडा धबधबा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

सवतसडा धबधबा हा कोकणातील चिपळूणपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. शनिवार आणि रविवार येथे पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याला जास्त ओढ असते.

चिपळूण आणि सवतसडा धबधब्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला पेढे या गावातील दत्त मंदिरही भेट देण्यासारखे आहे.