सानिया मिर्झा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट टेनिस खेळाडू साचा:MedalTableTop साचा:MedalCountry साचा:MedalCompetition साचा:रौप्यपदक साचा:कांस्यपदक साचा:MedalCompetition साचा:सुवर्णपदक साचा:सुवर्णपदक साचा:रौप्यपदक साचा:रौप्यपदक साचा:रौप्यपदक साचा:कांस्यपदक साचा:कांस्यपदक साचा:MedalBottom सानिया मिर्झा ( नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई) ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. सध्याच्या घडीला सानिया भारताच्या तेलंगण ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे. २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला.

कारकीर्द

सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासून टेनिस खेळण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केला. डब्ल्यू.टी.ए.च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमध्ये १०९ इतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.

ग्रँड स्लॅम कारकीर्द

महिला दुहेरी: २ (१-१)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २०११ फ्रेंच ओपन क्ले साचा:Flagicon एलेना व्हेस्निना साचा:Flagicon आंद्रेया लावाकोव्हा
साचा:Flagicon लुसी ह्रादेका
4–6, 3–6
Winner २०१५ विंबल्डन गवताळ साचा:Flagicon मार्टिना हिंगीस साचा:Flagicon येकातेरिना माकारोव्हा
साचा:Flagicon एलेना व्हेस्निना
5–7, 7–6(7–4), 7–5

मिश्र दुहेरी: ५ (३-२)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी २००८ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड साचा:Flagicon महेश भूपती साचा:Flagicon सुन तियांतियान
साचा:Flagicon नेनाद झिमोंजिक
6–7(4–7), 4–6
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड साचा:Flagicon महेश भूपती साचा:Flagicon नथाली डेशी
साचा:Flagicon अँडी राम
6–3, 6–1
विजयी २०१२ फ्रेंच ओपन क्ले साचा:Flagicon महेश भूपती साचा:Flagicon क्लॉडिया यान्स
साचा:Flagicon सान्तियागो गोन्झालेझ
7–6(7–3), 6–1
उपविजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन Hard साचा:Flagicon होरिया तेकाउ साचा:Flagicon क्रिस्टिना म्लादेनोविच
साचा:Flagicon डॅनियेल नेस्टर
3–6, 2–6
विजयी २०१४ यू.एस. ओपन हार्ड साचा:Flagicon ब्रुनो सोआरेस साचा:Flagicon ॲबिगेल स्पीयर्स
साचा:Flagicon सान्तियागो गोन्झालेझ
6–1, 2–6, [11–9]

पुस्तके

  • सानिया मिर्झाने 'Ace against Odds' ही इंग्रजी आत्मकथा लिहिली आहे. सचिन वाघमारे यांनी या आत्मकथेचा 'आव्हानांवर मात' या नावाचा मराठी अनुवाद केला आहे.

बाह्य दुवे

साचा:Commons category

साचा:राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार