साळवा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साळवा हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव तापी नदीपासून ७ कि.मी. अंतरावर आहे.साळवा या गावाचे नाव साळवे असे आहे पण कालांतराने बोलीमध्ये बदलामुळे साळवा असे नाव पडले.

अर्थव्यवस्था

हे गाव पूर्वी भरपूर पाणीपुरवठा असल्याने केळ्यांसाठी प्रसिद्ध होते. आता भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खालावल्याने पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे आता केळीचे उत्पन्न घसरले आहे. साळवा गावाची भरताची वांगी प्रसिद्ध आहेत.

गावातील धार्मिक स्थळेः

साळवे गावामध्ये एकमुखी दत्ताचे जागृत देवस्थान असून दरवर्षी तेथे मोठी यात्रा भरते.गावात विठ्ठल मंदीर, महादेव मंदीर, मारोती मंदीर इ. देवस्थानेही आहेत.विठ्ठल मंदिराजवळच मस्जिद आहे तसेच गावात बौद्धधर्मीयांसाठी समाज मंदिर आहे.