सुभाष पाळेकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

सुभाष पाळेकर (जन्म : बेलोरा (अमरावती जिल्हा, इ.स. १९४९) हे पद्मश्री पुरस्कारविजेते शेतीतज्‍ज्ञ व शेतकरी आहेत. 'झीरो बजेट' या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक शेतीचे ते पुरस्कर्ते आहेत. जमिनीच्या आरोग्याबरोबरच शेतकऱ्याचा जीवही धोक्यात, त्यामुळे सुभाष पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता.[१] म्हणूनच त्यांनी कमी खर्चाची 'झिरो बजेट' शेती करायला सुरुवात केली. शेण, वनस्पती इत्यादी उपलब्ध नैसर्गिक गोष्टींचा वापर करून कमी खर्चाची व रासायनिक खतांशिवायच्या शेतीला ते आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) शेती म्हणतात.

नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साहित्य वापरून जीवामृत व बीजामृत या दोन द्रव्यांची निर्मिती केली. जीवामृत या मिश्रणात त्यांनी वापरलेले गाईचे शेण जमिनीमधील गांडुळांना सुप्त अवस्थेमधून जागे करण्यासाठी गंधनिर्मितीचे कार्य करते. पाळेकर निसर्गशेतीमध्ये आंतरपीकबहुपीक पद्धती वापरतात.

लेखन

शेतीसंशोधक असलेल्या पाळेकरांनी शेतक‍ऱ्यांसाठी 'द फिलाॅसाॅफी ऑफ स्पिरिच्युअल फार्मिंग' व 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग' ही पुस्तके इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.

पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार (इ.स. २०१६)

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:अमरावती