सेमंगुडी श्रीनिवास अय्यर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट सेमंगुडी श्रीनिवास अय्यर (२५ जुलै १९०८ - ३१ ऑक्टोबर २००३) हे कर्नाटक संगीत पद्धतीचे प्रसिद्ध गायक होते. १९४७ मध्ये मद्रास संगीत अकादमीतर्फे संगीत कलानिधि हा पुरस्कार मिळविलेले ते सर्वात तरुण प्राप्तकर्ता होते. त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण (१९६९) आणि पद्मविभूषण (१९९०‌) दिले गेले. समकालीन गायक जी. एन. बालसुब्रमण्यम आणि मदुरई मणि अय्यर आणि सेमंगुडी यांना कर्नाटक संगीताचे २० च्या शतकातील त्रिमूर्ती म्हणून संबोधले जात असे. आधुनिक कर्नाटिक संगीताचे "पितामह" असाही त्यांचा उल्लेख होतो.[१] १९५१-१९६० या सहाव्या दशकात ते केरळ राज्यात संगीतशिक्षक होते, आणि तेव्हा श्री स्वाती तिरुनल यांच्या संगीतरचनांचा त्यांनी संग्रह सिद्ध केला. १९७९ मध्ये केरळ विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.[२]


एम एस सुब्बुलक्ष्मी, पारशाला पोनम्माळ, 'राजामणि' सुब्रमण्यम, पी एस नारायणस्वामी, व्हायलिन वादक टी एन कृष्णन्‌ इत्यादी गायक-वादकांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. संगीत-चर्चांमध्ये त्यांचा उल्लेख एस-एस-आय वा सेमंगुडी असा होतो.

पुरस्कार

संदर्भ

साचा:संदर्भयादी