सोनल मानसिंह

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट सोनल मानसिंह (जन्म ३० एप्रिल १९४४) ह्या भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शैलीच्या एक भारतीय शास्त्रीय नर्तक आणि गुरू आहेत. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी जुलाई २०१८ मध्ये नामांकन दिले आहे.[१][२][३]

जीवन

१९४४ मध्ये प्रख्यात समाजसेवक आणि पद्मभूषण विजेता अरविंद आणि पौर्णिमा पक्वासा या गुजराती घरात सोनल मानसिंगचा जन्म मुंबईत झाला. तिचे आजोबा मंगलदास पक्वासा हे स्वातंत्र्यसेनानी आणि भारताच्या पहिल्या पाच राज्यपालांपैकी एक होते.[४]

सोनल मानसिंग यांनी वयाच्या चौथ्या वर्षी नागपुरातील एका शिक्षकापासून तिच्या मोठ्या बहिणीसमवेत मणिपुरी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडानलूर घराण्यातील विविध गुरूंकडून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. मुंबईतील कुमार जयकर यांच्याकडूनदेखील य्यांनी नृत्याचे धडे घेतले. [५][६]

सोनल मानसिंग यांनी भारतीय विद्या भवनमधून संस्कृतमध्ये "प्रवीण" आणि "कोविद" आणि मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून जर्मन साहित्यात बीए (ऑनर्स) पदवी मिळविली आहे. वयाच्या १८व्या वर्षी आपल्या कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्या बंगलोरला भरतनाट्यम नृत्यातील खरे प्रशिक्षण घेण्यासाठी प्राध्यापक यूएस कृष्णाराव आणि चंद्रभागा देवी यांच्याकडे गेल्या. १९६५ साली त्यांनी मायलापूरच्या गौरी अम्मल यांच्याकडून अभिनय आणि गुरू केलुचरण मोहपात्रा यांच्याकडून ओडिसी नृत्य शिकण्यास सुरुवात केली.[७] १९७७ साली त्यांनी नवी दिल्ली येथे सेंटर फॉर इंडियन क्लासिकल डान्स' (सीआयसीडी)ची स्थापना केली.[८][९]

मायाधर मानसिंह यांनी सोनलची ओळख त्यांचे चिरंजीव भारतीय मुत्सद्दी ललित मानसिंह यांच्याशी करून दिली होती. दोघांनी पुढे लग्न केले आणि नंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.[१०][११]

वर्षानुवर्षे करीत राहिलेल्या नृत्याने त्यांना जगभरात प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले.[१२] १९९२ मध्ये भारत सरकार ने पद्मभूषण प्रदान केले.[१३] १९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.[१४] भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा त्यांना २००३ मध्ये मिळाला. बालसरस्वतीनंतर असा मान मिळवून देणारी ही भारतातील दुसरी महिला नर्तकी बनली.[१५] त्यानंतर मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानाने २००६ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. एप्रिल २००७ मध्ये उत्तराखंडातल्या पंतनगर येथील गोविंद वल्लभदास पंत विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स (Honoris Causa-ऑनरिस कॉसा) आणि संबळपूर विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर (ऑनोरिस कॉसा) या मानद पदव्यांनी सन्मानित केले.[१६]

२००२ मध्ये नृत्यसेवेच्या ४० वर्षांच्या पूर्णतेच्या निमित्ताने हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सोनल मानसिंग यांच्यावर 'सोनल' नावाचा एक माहितीपट बनविला. या माहितीपटाला त्यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१७]

संदर्भ

साचा:संदर्भयादी