हटकर
साचा:विकिकरण हटकर हा शब्द हट्टीकारा या कन्नड शब्दावरून आला आहे.
कानडी-मराठी शब्दकोशामधे हट्टी म्हणजे गाई-बैल असा अर्थ दिलेला अढळतो. हट्टीकारा म्हणजे गाईबैलांचा मालक. हटकर हे पशुपालक असले तरी चालुक्य, होयसळ राजघराण्यांचे सेनापती सैनिक हे हटकर असल्याचे उल्लेख कन्नड शिलालेखांमधे सापडतात. महाराष्ट्रात असलेले हटकर ही एक लढाऊ जमात आहे. परंपरेने लढाई करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. यातूनच त्यांच्यात अनेक मोठी सरदार घराणी उदयाला आल्याचे दिसते. यांत सरदार धायगुडे, राजेपांढरे, बळंवतराव किताब असलेले देवकाते, राजे सरगर, मासाळ, हंडे इ. घराणी सापडतात यांत नेमाजी शिंदे या हटकर मराठी वीराने सर्वप्रथम नर्मदा नदी ओलांडली; त्याच काळात दामाजी थोरात हे एक पराक्रमी सरदार होते.
हटकरांना हट्टीकारा, बाराहट्टी, बरहट्टी, झेंडे, बंडगर, बंडे, बर्गी धनगर, बारगीर या ना्वांनीसुद्धा ओळखले जाते. आज हटकर जमातींमधील काही आडनावे कारंडे, कोकरे,कोळगिर, कोळेकर, गडदे, गावडे, गोरड,होळगिर,धुळगंडे,भोरगिर,नरवटे,कर्ले, जानकर, थोरात, धायगुडे, देवकर, देशमुख, घुगरे, देवकाते, नरोटे, पडळकर, पाटील, पांढरे, पुणेकर, पोले, भिसे, मसरक, माने, मार्कंड, मार्कडे, मासाळ, मेमाणे, मोरे, लवटे, लोखंडे, मस्के, वडकुते, वलेकर, वाघमारे, वाघमोडे, शिंगाडे, शिंदे, सरोदे, सरगर, सलगर, सापनर, सुरनर,राऊतराय,सूळ, सोलणकर किंवा सोनवलकर, हंडे, हराळ, हस्के, हाके, होडबे, हापगुंडे वगैरे आहेत..
तसेच काही हटकरांना पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे या उपाध्या आहेत.
Captain Fitzgerald यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात महाराष्ट्रात बारा कुळींचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले. त्याला बाराहट्टीचा देश म्हणू लागले. सध्या या भागाला हिंगोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते, आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव पडले.
"१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात हटकरसुद्धा आले होते असे ते म्हणतात" सर्व हटकर हे मेंढीपालन करतात, ते जेव्हा कधी मोहिमेवर जातात तेव्हा हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊनच निघतात.त्यामुळे त्यांना बर्गी धनगर आणि बारगीरसुद्धा म्हटले जाते. हटकरांचा स्वभाव हा हट्टी आणि भांडखोर आहे.
अकबराने 'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे, तो असा - "हटकर हे स्वाभिमानी आहेत, ही राजपुतांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे. त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले कबजात ठेवले आहेत. त्यांना धनगरपण म्हणतात पण ते राजपूत आहेत आणि हे खरे आहे.
निजामाच्या राज्यात यांचा दरारा होता. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्टपुष्ट, स्वतंत्र राहणारे, आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना भटके असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळ हा आहे. पण मूळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.
हटकरांचा ध्वज : हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळी हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन साम्राज्यांचे आहेत. एक म्हणजे दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य. त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे. आणि दुसरे म्हणजे राजस्थान आणि पंजाब मधील भाटी राजपुतांच्या राज्याचे झेंडे. हे झेंडे रंगाने मिळते जुळते आहेत.महाराष्ट्रात धनगर समाजाचे दोन मुख्य प्रवाह आहेत असे सांगितले जाते त्यापैकी एक म्हणजेच हटकर होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर (मेंढपाळ) सरदारांची नावे- १. निम्बाजी पाटोळा २. हिरोजी शेळके ३. दादाजी काकडे ४. बळवंतराव देवकाते ५. व्यंकोजी खांडेकर ६. अंगदोजी पांढरे ७. धनाजी शिंगाडा ८. भावाणराव देवकाते ९. बनाजी बिर्जे १०. येसजी थोरात ११. संभाजी पांढरे १२. गोदाजी पांढरे १३. इन्द्राजी गोरड १४. नाईकजी पांढरे छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठे आणि औरंगजेब यांच्यात ज्या लढाया झाल्या त्यामधून प्रसिद्ध झालेली हटकर (मेंढपाळ) घराणी- १,देवकाते २.बंडगर ३.शेंडगे ४.कोळेकर ५. कोकरे ६.गोफणे ७. वाघमोडे ७. काळे ८. धायगुडे ९. शिंदे १०. मासाळ ११. हजारे १२.मदने १३. खरात १४. शेळके १५. सलगर १६. पुणेकर १७. पाटोळे १८. खताळ १९. माने २०. फणसे २१. टकले २२. बारगळ २३. शिंगाडे २४. डांगे २५. काकडे २६. गाढवे २७. महानवर २८. बरगे २९. हाके ३०. रूपनवर ३१. गलांडे ३२. भानुसे ३३. सोलणकर किंवा सोनवलकर ३४. बने ३५. आगलावे ३६. वाघे ३७. वाघमारे ३८. पांढरे ref>परभणी दर्शनिका</ref> [१][२][३][४] [५][६]