Jump to content

हरगड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट किल्ला

हरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त म्हणजे १३५७ मीटर इतकी आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

गडमाथा तसा विस्तीर्ण आहे. गडमाथा म्हणजे एक पठारच होय. या पठारावर काही तटबंदीचे अवशेष आहेत. पाण्याची दोन टाकी आहेत. एक पडके मंदिर आहे. वाड्यांचे काही अवशेष आढळतात. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिण्यासारखे नाही. गडफेरी मारताना पुढे सपाटीवर एक गुहा आढळते यात कपार भवानीचे मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावर जाणारी वाट मुल्हेर गावातून जाते. मुल्हेर गावातून पुढे आल्यावर एक डांबरी रस्ता लागतो. या रस्त्याने वीस मिनिटे पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात. एक डावीकडे जातो, तर दुसरा वडाच्या झाडापासून पुढे जातो. ही वाट छोटाश्या टेकडीवर असणाऱ्या धनगर वाडीपाशी पोहोचते. येथून उजवीकडे वळावे आणि थेट मुल्हेर व हरगड यांमधील खिंड गाठावी. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास पुरतो. खिंडीत डावीकडे जाणारी वाट आपल्याला मुल्हेरगडाकडे तर उजवीकडे जाणारी वाट हरगडाकडे घेऊन जाते. वाट फारशी मळलेली नसल्यामुळे अस्पष्ट झालेली आहे. या खिंडीपासून गडमाथा गाठण्यास एक तास लागतो.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले