हलाहल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

हलाहल हे समुद्रमंथनातून निघालेले विष आहे. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हे हलाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले.

समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. कारण ह्या विषाचा एकही थेंब जर धरतीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते, म्हणून शिवाने ते प्राशन केले. ते पिताच शिवाच्या अंगात दाहकता वाढली आणि त्यांचा कंठ काळा-निळा झाला. तेव्हा श्री विष्णूनी शिवाला " नीलकंठ " हे नाव प्रदान केले. विषपान करताना काही विष पृथ्वीवर पडले होते, ज्याचा अंश आजही आपल्याला विषारी साप, विंचू आणि कीटकांमध्ये दिसते. [१]


संदर्भ यादी