हिंदू जनजागृती समिती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संघटना

प्रस्तावना

हिंदू जनजागृती समिती ही एक हिंदू संस्था आहे.[१][२] सनातन संस्थेच्या साधकांनी ७ ऑक्टोबर २००२ रोजी संस्थेची जागतिक स्तरावर स्थापना केली. ह्या संस्थेचे संकेतस्थळावर "हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी" असे लिहीले आहे, ही संस्था सर्व हिंदूंना एकत्र येण्यासाठीचा मंच म्हणून पहाते आहे असेही त्या संकेतस्थळावर नोंदवलेले आहे.[३]

कार्य

हिंदू जनजागृती समिती, ज्यांच्या नावातच हे विहित आहे की, ही संस्था हिंदूंच्या वैचारिक जागरणासाठी काम करते, [४] ही संस्था अनेक निषेध मोर्चे आणि निदर्शनांमध्ये सतत सहभाग नोंदवत असते, त्यातीलच एक म्हणजे एम.एफ़. हुसेन यांच्यावरी चित्रपट आणि प्रत्यक्ष कलाकारावरची म्हणजे एम, एफ़, हुसेन यांच्यावरील बंदीची मागणी. [५] सांप्रदायिक आणि जाणुनबुजून केलेली हिंसा यांपासून थांबवणारा (न्याय आणि नुकसान भरपाई कायदा) ह्या कायद्याला केला गेलेला विरोध.[६]जोस परेरा यांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या चित्रांवर आक्षेप घेऊन त्यांनी ह्या चित्रांचे प्रदर्शन कुठलेही कारण न देता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती, त्यावर २०१० मध्ये डेक्कन हेराल्ड ह्या वृत्तपत्राने हिंदू जनजागृती समितीला वेड्या लोकांचा गट म्हणून उल्लेखीले आहे.[७] २०११-२०१२ मध्ये गोव्यात केल्या गेलेल्या  फ़्लेक्स(जाहिरातींवर) अश्लिलतेचे आरोप करून काढुन टाकले जावे अशी मागणी केली,[८] गोवा टुरीजम मार्टच्या कार्यक्रम पत्रिकेमधून एल.जी.बी.टी टूरिजमवरील एक आख्खे सत्रच काढून टाकण्यात आले,[९] रशियामधील एक हिंदू मंदिर पाडण्याच्या निर्णयावर केले गेलेले निदर्शने केली.[१०]

जुन २०१२ मध्ये फ़ोंडा, गोवा येथे हिंदू जनजागृती समितीने पाच दिवसांचे एक अखिल भारतीय संमेलन आयोजित केले होते, ज्याला भारत भरातून अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि या संमेलनात हिंदू राष्ट्राच्या उभारणीचा आराखडा चर्चीला गेला आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाचा विचार केला गेला.[११]

रझा अकेडमी ह्या मुस्लिम गटावर बंदी आणण्यासाठी समितीच्या लोकांनी मागणी केली.[१२]

संदर्भ

साचा:संदर्भयादी