हिम्मतराव बावस्कर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

डॉ.हिम्मतराव साळूब बावस्कर हे मूळचे देहेड तालुका भोकरदन जिल्हा जालना महाराष्ट्र येथील एका शेतकरी कुटुंबातून अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावलेले संशोधक आहेत. त्यांना २०२२ साली पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.[१]

   खास करून कोकणात महाड येथे काम करत असतांना त्या ठिकाणी नेहमीच विंचू दंश झाल्याच्या घटना घडत व त्यासाठी उपचार मिळणं दुर्गम भागात कठीण काम होते त्यासाठी या विषयावर त्यांनी भरीव काम केलेले असून त्याबाबत त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
   ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहून काम करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक भारतीय डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय संशोधणार लेख ब्रिटिश मेडिकल जर्नल, द लँसेटमध्ये प्रकाशित झाले आहेत.
   [२][३] ते विंचू विषबाधेच्या उपचारांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. 

वैद्यकीय पेशातील भ्रष्टाचारविरोधी लढ्यात बावस्कर सहभागी आहेत.[४]

संदर्भ

साचा:संदर्भयादी