इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
साचा:Infobox cricket tour नोव्हेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघ पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने जुलै २०१६ मध्ये दौऱ्याच्या तारखा जाहीर केल्या.[४] कसोटी मालिका समाप्त झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मायदेशी परतला आणि एकदिवसीय सामन्यासाठी पुन्हा भारतात आला.[५]
भारताने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सुधारित डीआरएस पद्धत वापरण्यास सहमती दर्शवली.[६][७] २००८ मध्ये एकदा चाचणी केल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा समावेश असलेल्या द्विपक्षीय मालिकेमध्ये डीआरएस प्रणाली वापरली गेली.[८] परंतू, हॉटस्पॉटचा वापर केला गेला नाही.[९]
सदर कसोटी मालिका ॲंथोनी डीमेलो चषकासाठी खेळवली गेली, ज्यामध्ये भारताने ५-सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.[१०] मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने ७ बाद ७५९ धावांवर डाव घोषित करून कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली.[११] पाचव्या कसोटीतील विजयामुळे भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहिला आणि स्वतःचा १७ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा विक्रम मोडला.[१२] त्याशिवाय भारताने एका वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक ९ कसोटी सामने जिंकले.[१२]
मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघ जाहीर होण्या आधी, महेंद्रसिंग धोणीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट कर्णधार पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.[१३][१४] टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड करण्यात आली.[१५] भारतीय संघाचा कर्णधार म्हणून धोणीचा शेवटचा सामना होता इंग्लंड XI विरुद्ध १० जानेवारी २०१७ रोजी झालेला ५०-षटकांचा सामना.[१६]
एकदिवसीय मालिकेमध्ये तब्बल २०९० धावा केल्या गेल्या, तीन किंवा कमी सामन्यांच्या मालिकेमधील हा एक विक्रम आहे.[१७] सर्वच्या सर्व डावांमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा नोंदवल्या गेल्या. भारताने एकदिवसीय आणि टी२० मालिका २-१ अशा जिंकल्या. इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिका जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ.[१८]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
|---|---|---|---|---|---|
| साचा:Cr[१९][२०] | साचा:Cr[२१][२२] | साचा:Cr[१५] | साचा:Cr[२३] | साचा:Cr[१५] | साचा:Cr[२३] |
- दुखापतीतून सावरल्यानंतर जेम्स ॲंडरसनचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला.[२४]
- दुखापतीतून सावरल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला.[२५][२६]
- शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारची भारतीय संघात निवड करण्यात आली, तर गौतम गंभीरला वगळण्यात आले.[२७]
- डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने मोहाली येथील तिसऱ्या कसोटीसाठी वृद्धिमान साहा ऐवजी पार्थिव पटेलची निवड करण्यात आली.[२७]
- पीसीए मैदानावर नेट्समध्ये सरावादरम्यान लोकेश राहुल आणि हार्दीक पंड्या ह्यांना दुखापत झाली. पंड्याला संघातून वगळण्यात आले, परंतु लोकेश राहुल चवथ्या कसोटीसाठी तंदरुस्त होण्याची अपेक्षा आहे.[२८]
- तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या हसीब हमीदच्या हाताला दुखापत झाल्याने, शस्त्रक्रियेसाठी त्याला मायदेशी परतावे लागले.[२९] त्याच्या ऐवजी किटन जेनिंग्सची संघात निवड करण्यात आली.[३०]
- पाठीच्या दुखण्यामुळे झफर अन्सारी ऐवजी लियाम डॉसनची इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आली.[३०]
- इशांत शर्माला त्याच्या लग्नासाठी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमधून सुट्टी देण्यात आली. त्याशिवाय दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने वृद्धिमान साहा चवथ्या कसोटीत सुद्धा खेळू शकणार नाही[३१][३२]
- बोटाला झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे शेवटच्या दोन कसोटींना मुकला. त्याची जागा मनीष पांडेने घेतली.[३३]
- मोहम्मद शमीचा गुडघा सुजल्यामुळे संघात शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली.[३३]
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे उर्वरित मर्यादित षटकांच्या सामन्यातून ॲलेक्स हेल्सला वगळण्यात आले.[३४]
- टी२० मालिकेसाठी हेल्स ऐवजी जॉनी बेरस्टोला निवडण्यात आले.[३५]
- टी २० मालिकेआधी, भारतीय संघातून रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली, त्यांच्या ऐवजी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना संघात स्थान देण्यात आले.[३६]
सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५० षटके: भारत अ वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
५वी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
टी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२.० १२.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १५.० १५.१ १५.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ २३.० २३.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ २७.० २७.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ ३०.० ३०.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ ३३.० ३३.१ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी