Jump to content

गजाननबुवा जोशी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट गायक

गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी (३० जानेवारी, इ.स. १९११ - इ.स. १९८७/१९८८) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्राजयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक गायक.साचा:संदर्भ हवा

पूर्वायुष्य[संपादन | स्रोत संपादित करा]

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.साचा:संदर्भ हवा

सांगीतिक कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.साचा:संदर्भ हवा

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:हिंदुस्तानी संगीत