डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९६६ चे पुस्तक)
Appearance
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इ.स. १९६६ मधील लेखक धनंजय कीर लिखित भारतीय विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे.[१][२] हे पुस्तक आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल १९६६ रोजी मुंबईतील पॉप्युलर प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आंबेडकरांचे हे एक उल्लेखनीय चरित्र आहे. आंबेडकरांच्या लेखनाची यादी, आंबेडकरांवरील लेखनाची यादी तसेच आंबेडकरांचा थोडक्यात जीवनपट या बाबींही पुस्तकात समाविष्ट आहे.[३][४] या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी, जपानी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत.[५][६][७]
कीर यांनी इ.स. १९५४ मध्ये आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "डॉ. आंबेडकर: लाईफ अँड मिशन" देखील लिहिले आहे, जे आंबेडकरांचे तिसरे चरित्र आणि पहिले इंग्रजी चरित्र आहे.[८][९]
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)