आंबेडकर जयंती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox holiday

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.

संसद भवनामध्ये १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या १२५व्या जयंती निर्मिती अभिवादन करताना लोक.

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.[२][३]

आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.

नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.[४]

पार्श्वभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.[३][५]

१२५वी जयंती

इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होतो. भारत सरकारने सुद्धा व्यापक प्रमाणात संपूर्ण देशभरात आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी केली होती. ही जयंती जगातल्या १०२ देशांत साजरी करण्यात आली होती.[६] संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले.[७] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांच्येशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.[८] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिनही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१७ व २०१८ मध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली.[९][१०][११][१२]

विशेष अभिवादने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा विविध प्रकारे सन्मान करत त्यांना विशेष अभिवादने केली जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

 • भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त टपाल तिकिटे काढले होते. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[१३][१४]
 • इ.स. १९९० मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची १००वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ आंबेडकरांची प्रतिमा असलेले एक रुपयाचे नाणे काढले होते.[१५] आंबेडकरांची १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ₹१० आणि ₹१२५ची नाणी २०१५ मध्ये निघाली होती.. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.[१६]
 • इ.स. २०१५ मध्ये, गुगलने आंबेडकरांच्या १२४व्या जयंती निमित्त आपल्या 'गूगल डूडल' वर त्यांची प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन केले होते. तीन खंडातील सात देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते. हे डूडल भारत, आर्जेन्टिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम मध्ये दाखवले गेले होते.[१७][१८][१९][२०][२१][२२][२३][२४]
 • इ.स. २०१७ मध्ये, महाराष्ट्र राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस "ज्ञान दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.[२५][२६][२७][२८][२९][३०][३१][३२]
 • अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इ.स. २०१६, २०१७ व २०१८ या तीन वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे.[९][१०][११][१२]
 • इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.[३३][३४]
 • ६ एप्रिल २०२० रोजी, कॅनडामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा 'समता दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कॅनडा येथील ब्रुनाबे या शहरातील महापालिकेने घेतला असून त्यासंदर्भातील आदेश तेथील महापालिका प्रशासनाने महापौर माईक हेरले यांच्या सहीनिशी काढले होते. त्यानंतर तेथे आंबेडकर जयंती 'समता दिन' म्हणून पाळण्यात आली.[३५][३६]
 • डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कॅनडातल्या ब्रिटीश कोलंबियातर्फे, 'वर्ल्ड साइन ऑफ इक्वालिटी' अर्थात 'समतेचं जागतिक प्रतीक' हा सन्मान जाहीर झाला आहे. तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कॅनडात 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

साजरीकरण

संपूर्ण भारतभर सर्व लहान-मोठ्या शहरांत आनंद-उल्हासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा वाराणशीत डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवसाच्या उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आंबेडकरवादी कार्यकर्ते हे चित्रकलास्पर्धा, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळाच्या स्पर्धा आणि नाटके असे कार्यक्रम आयोजित करतात. त्यांसाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनौमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघाद्वारे प्रत्येक वर्षी एक मोठे सेमिनार आयोजित होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर साचा:भारतीय सण आणि उत्सव साचा:बौद्ध सण

 1. साचा:Cite web
 2. साचा:संकेतस्थळ स्रोत
 3. ३.० ३.१ साचा:स्रोत बातमी
 4. साचा:Cite web
 5. एप्रिल २०१८चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)
 6. साचा:संकेतस्थळ स्रोत
 7. United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
 8. साचा:संकेतस्थळ स्रोत
 9. ९.० ९.१ साचा:Cite web
 10. १०.० १०.१ साचा:Cite web
 11. ११.० ११.१ साचा:Cite news
 12. १२.० १२.१ साचा:Cite news
 13. Ambedkar on stamps. colnect.com
 14. B. R. Ambedkar on stamps. commons.wikimedia.org
 15. साचा:संकेतस्थळ स्रोत
 16. साचा:संकेतस्थळ स्रोत
 17. साचा:संकेतस्थळ स्रोत
 18. साचा:Cite news
 19. साचा:संकेतस्थळ स्रोत
 20. साचा:संकेतस्थळ स्रोत
 21. साचा:संकेतस्थळ स्रोत
 22. साचा:स्रोत बातमी
 23. साचा:स्रोत बातमी
 24. Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
 25. साचा:संकेतस्थळ स्रोत
 26. साचा:संकेतस्थळ स्रोत
 27. साचा:संकेतस्थळ स्रोत
 28. साचा:संकेतस्थळ स्रोत
 29. साचा:संकेतस्थळ स्रोत
 30. साचा:स्रोत बातमी
 31. साचा:संकेतस्थळ स्रोत
 32. साचा:स्रोत बातमी
 33. साचा:स्रोत बातमी
 34. साचा:स्रोत बातमी
 35. साचा:Cite web
 36. साचा:Cite web