Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन - मराठीपिडिया Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
संसद भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २००९ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनातील डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्राला अभिवादन केले.

नवी दिल्लीतील भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तैलचित्र आहे. १२ एप्रिल १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या तैलचित्राचे अनावरण केले.[][] चित्रकार झेबा अमरोहवी या महिलेने बाबासाहेबांचे तैलचित्र तयार केले होते.[][] डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी हे तैलचित्र संंसदेस भेट दिले होते.[][] या तैलचित्राचा आकार ७'३" x ४'३" आहे.[][] या तैलचित्राचे अनावरण होत असताना दक्षिण आफ्रिकेचे नेता नेल्सन मंडेला म्हणाले होते की, आम्ही डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुद्धा त्याच आधारांवर चालवणार ज्या आधारांवर डॉ. आंबेडकरांनी समाज परीवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवले.[]

भारतीय संसदेमध्ये डॉ. आंबेडकरांचे तैलचित्र असावे अशी मागणी १९५७ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व खासदार बी.सी. कांबळे यांनी केली होती. संसदेसोबतच राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयातही बाबासाहेबांचे तैलचित्र लावण्यात यावे अशीही मागणी कांबळे यांनी केली होती.[]

डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी उत्सवाची तारीख १४ एप्रिल १९९१ होती, या दिवशी बाबासाहेबांची १००वी जयंती असणार होती. तथापि, बाबासाहेबांचा जन्मशताब्दी उत्सव १४ एप्रिल १९९० ते १४ एप्रिल १९९१ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कल्याण मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा कल्याण मंत्री रामविलास पासवान होते तर पंतप्रधान व्ही.पी. सिंग होते. याच काळात सरकारने डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात (केंद्रीय कक्षात) त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.[] आंबेडकरांचे तैलचित्राचे संसदेत असावे याची मागणी बऱ्याच काळापासून जनता आंबेडकरी समाजाकडून केली जात होती, परंतु मध्यवर्ती सभागृहाच्या भिंतीवर अजून एक तैलचित्र लावण्यास जागाच नाही असे कारण सांगत भारत सरकार ते काम करत नव्हते. तथापि जेव्हा संसदेच्या सभागृहात आंबेडकरांचे तैलचित्र लावले जावे असा राजकीय पातळीवर निर्णय घेण्यात आला तेव्हा भिंतीवरही जागा निर्माण झाली.[]

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१४ एप्रिल २००७ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ११६व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१४ एप्रिल २००६ रोजी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ११५व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
S.M. Krishna, the Union Minister for Labour and Employment, Shri Mallikarjun Kharge, the Union Minister for Social Justice and Empowerment, Shri Mukul Wasnik, the Leader of Opposition in Lok Sabha, Smt. Sushma Swaraj

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर