Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
चैत्यभूमी - मराठीपिडिया Jump to content

चैत्यभूमी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट इमारत

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चैत्यभूमीचे प्रवेशद्वार व त्यातील अशोकस्तंभ

चैत्यभूमी (अधिकृत: परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी) हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधिस्थळ आहे. हे एक चैत्यस्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.[][][][]

चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक २ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आला आहे.[]

संरचनात्मक तपशील[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चैत्यभूमी स्तूपाच्या आतील भागातील बुद्धमूर्ती व बाबासाहेबांचा पुतळा

एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. ​​बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे.

चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून मीरा आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९७१ रोजी केले. [][] येथे, डॉ. आंबेडकरांचे अवशेष समाविष्ट केले आहेत.[]

महापरिनिर्वाण दिन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिन, ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. या दिवशी चैत्यभूमीवर २५ लाखाहून अधिक आंबेडकरानुयायी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली देण्यासाठी येत असतात.[]

भीमज्योत[संपादन | स्रोत संपादित करा]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेला साडे २१ लाख रुपये खर्च आला. ११ सप्टेंबर २०१९ रोजी या भीमज्योतीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ही भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिलीमीटर काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहिल. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे २४ तास अखंड गॅस पुरवठा केला जाईल. गौतम बुद्धांचा, 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. याच्या तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली भीमज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बसवण्यात आली होती. दुसरी अखंड भीमज्योत ही दादर येथील चैत्यभूमी परिसरातील आहे.[][]

भेटी देणारे उल्लेखनीय व्यक्ती[संपादन | स्रोत संपादित करा]

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.[१०]

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे हे १९७८ मध्ये चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते.[११] त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांच्या ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआदित्य ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी गेले.

चित्र दीर्घा[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर साचा:मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे