लखनौ सुपर जायंट्स २०२२ संघ
साचा:Infobox cricket club season लखनौ सुपर जायंट्स हा लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. हा संघ भारतीय प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार आहे. [१][२] संघाची मालकी RPSG समुहाकडे आहे ज्यांच्याकडे यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट फ्रँचायझी होती. संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे तर प्रशिक्षकपदाचा भार अँडी फ्लॉवर यांच्याकडे आहे.[३]
आयपीएल २०२२ च्या १५ व्या आवृत्तीसाठी लखनौ फ्रँचायझी नव्याने स्थापन करण्यात आली. संजीव गोयंका यांच्या मालकीच्या RPSG ग्रुपने तब्बल ७,०९० कोटी रुपयांना फ्रँचायझी विकत घेतली.[४] यापूर्वी, आयपीएल २०२१ पर्यंत आठ संघ एकमेकांसोबत खेळत होते. लखनऊ संघाने २४ जानेवारी २०२२ रोजी अधिकृत ट्विटर हँडलवर आयपीएल २०२२ साठी त्यांचे नाव "लखनौ सुपर जायंट्स" म्हणून घोषित केले.
पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]
नवीन संघ म्हणून, फ्रँचायझीला २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड करण्याची मुभा होती.[५][६]
फ्रँचायझीने २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंची निवड केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील भारताचा स्टँड-इन कर्णधार लोकेश राहुल, हा लखनौ फ्रँचायझीसाठी पहिला अधिग्रहित केलेला खेळाडू होता आणि त्याला १७ कोटी रुपयांत कारारबद्ध करण्यात आले. मार्कस स्टोइनिसला ९.२ कोटी रुपयांमध्ये तर युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोई २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी ४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले गेले.
लखनौ संघासाठी तीन खेळाडूंशी करार केल्यानंतर, मेगा लिलाव २०२२ आधी त्यांच्याकडे रु. ५९.८ कोटी रक्कम उरली. लखनौ टीमला जास्तीत जास्त रु. ९० कोटी खर्च करण्याची परवानगी होती
याशिवाय एलएसजीने आयपीएल लिलाव २०२२ मध्ये आणखी १८ नवीन खेळाडूंशी करार केला. नवीन फ्रँचायझीने बंगळूरमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२२ मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी एकूण आठ खेळाडूंना (५- भारतीय खेळाडू, ३- परदेशी खेळाडू) खरेदी केले आणि लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आणखी १३ खेळाडूंना त्यांच्या संघामध्ये जोडले. फ्रँचायझीसाठी सर्वात महागडा खेळाडू म्हणजे गोलंदाज अवेश खान (आधारभूत किंमत २० लाख) हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला, त्याला लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने ₹१० कोटींमध्ये खरेदी केले. अवेश खान नंतर[७], दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ऑल राउंडर जेसन होल्डर (आधारभूत किंमत १.५ कोटी), ज्याला लिलावात रु. ८.७५ कोटींमध्ये खरेदी केले गेले .
ऑल राउंडर कृणाल पंड्याला (आधारभूत किंमत २ कोटी) रु. ८.२५ कोटीमध्ये करारबद्ध करण्यात आले. लखनौ फ्रँचायझीने एकूण २१ खेळाडू खरेदी केले आहेत ज्यात ७ अष्टपैलू, ७ गोलंदाज, १ यष्टीरक्षक आणि ३ फलंदाज आहेत. ज्यामध्ये १४ भारतीय आणि ७ परदेशी खेळाडू आहेत.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
- संघातील खेळाडू : २१ (१४ - भारतीय, ७ - परदेशी)
प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी[संपादन | स्रोत संपादित करा]
| स्थान | नाव |
|---|---|
| मालक | संजीव गोएंका |
| सीईओ | रघु अय्यर |
| प्रशिक्षक | अँडी फ्लॉवर |
| मार्गदर्शक | गौतम गंभीर |
| सहाय्यक प्रशिक्षक | विजय दहिया |
| गोलंदाजी प्रशिक्षक | अँडी बिकेल |
| स्रोत: https://www.facebook.com/LucknowSuperGiantsIPLT20/ | |
किट उत्पादक आणि प्रायोजक[संपादन | स्रोत संपादित करा]
| किट उत्पादक | शर्ट प्रायोजक (चेस्ट) | शर्ट प्रायोजक (बॅक) | चेस्ट ब्रॅंडिंग |
|---|---|---|---|
| पुमा | माय११सर्कल | झी५ | टाटा मीठ |
| स्रोत : | |||
साचा:Col-2 |साचा:Cricket uniform साचा:Col-end
गटफेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[८]
सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने