Jump to content

वाकडी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र वाकडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता या तालुक्यातील आहे. वाकडी गाव खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ११९३० आहे. त्यापैकी ६१८५ पुरुष व ५७४५ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

बहुतेक लोक शेती व संबंधित कामे करतात. गावातून जाणाऱ्या कालव्यामुळे बरेचसे क्षेत्र सिंचित झालेले आहे. सहकारी साखर कारखाना लगतच्या गावात स्थित आहे. काही काळापूर्वी गावात ऊस लागवड मोठया प्रमाणावर केली जायची परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये यात घट झाली आहे.

परिवहन[संपादन | स्रोत संपादित करा]

रस्ते[संपादन | स्रोत संपादित करा]

वाकडी गाव श्रीरामपुर व शिर्डीला शिर्डी - शिंगणापूर राज्यमार्गने जोडलेले आहे.

रेल्वे[संपादन | स्रोत संपादित करा]

चितळी रेल्वे स्टेशन हे नजीकचे रेल्वे स्टेशन आहे.

हवाई[संपादन | स्रोत संपादित करा]

शिर्डी विमानतळ गावापासून २७ किमीवर स्थित आहे.