Jump to content

सप्तर्षी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सप्तर्षी म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे - अकारविल्हे :

  • अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  • अत्रि (Delta Ursae Majoris)
  • क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  • पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  • पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  • मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  • वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो.

सप्तर्षींमधील ताऱ्यांचा आकाशातला (घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार-clockwise-सव्य)क्रम (α) क्रतु (β) पुलह (γ) पुलस्त्य (δ) अत्रि (ε) अंगिरस) (ζ) वसिष्ठ (शेजारी अरुंधती) आणि (η) मरीचि असा आहे.

मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी

या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य(देवसावर्णि) आणि भौत्य(इंद्रसावर्णि) अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील. साचा:सप्तर्षी

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

चांदण्यांची नावे