Jump to content

नवरत्‍न कंपन्या

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

१९९७ साली, नवरत्‍न हा किताब भारत सरकारने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे नवरत्‍ने ह्यावरून दिला गेला. सध्या भारतामधील सर्व सरकारी कंपन्या (पब्लिक सेक्टर) खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणुकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत.

प्रकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • नवरत्‍न
    • निव्वळ नफा, निव्वळ मूल्य, उत्पादन क्षमता, उत्पादन खर्च, सेवा खर्च, भांडवल इत्यादी ६ घटकांवर आधारित चाचणीमध्ये १०० पैकी किमान ६० गूण
    • कंपनी नवरत्‍न बनण्यापूर्वी मिनिरत्‍न असणे आवश्यक.
  • मिनिरत्‍न वर्ग-१
    • मागील ३ वर्षे सलग नफा कमवला आहे किंवा एका वर्षात साचा:रुपया ३० कोटी नफा कमवला आहे
  • मिनिरत्न वर्ग-२
    • बाजार मूल्य शून्याहून अधिक आहे व गेली तीन वर्षे नफा कमवला आहे.

यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतामध्ये एकूण 11 महारत्‍न, १४ नवरर्‍न, 61 मिनिरत्‍न वर्ग-१ तर 12 मिनिरत्‍न वर्ग-२ कंपन्या आहेत.

महारत्‍न कंपन्या[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड[]
  2. कोल इंडिया लिमिटेड []
  3. गेल (इंडिया) लिमिटेड[]
  4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन []
  5. एन.टी.पी.सी. []
  6. ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन []
  7. स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
  8. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  9. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  10. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
  11. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

नवरत्‍न कंपन्या[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
  2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
  3. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
  4. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड
  5. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
  6. नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
  7. ऑइल इंडिया लिमिटेड
  8. राष्ट्रीय इस्पात निगम
  9. रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन
  10. भारतीय नौवहन निगम

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी