Jump to content

चणकापूर धरण माहिती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चणकापूर धरण हे गिरणा नदीवर कळवण शहरापासून १९ किमी अंतरावर चणकापूर गावाजवळ सन १९११ साली बांधण्यात आले आहे. हे ब्रिटीशकालीन धरण म्हणून प्रसिद्ध आहे,. जुन्या धरणाची उंची वाढवून आणि मजबुतीकरण करून १९६७ ते १९७३ या काळात पुन्हा धरणाच्या बांधकामात सुधारणा करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा उजवा व डावा या दोन्ही पाताखालील क्षेत्र वाढविण्यात आले आहे.