चणकापूर धरण माहिती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

चणकापूर धरण हे गिरणा नदीवर कळवण शहरापासून १९ किमी अंतरावर चणकापूर गावाजवळ सन १९११ साली बांधण्यात आले आहे. हे ब्रिटीशकालीन धरण म्हणून प्रसिद्ध आहे,. जुन्या धरणाची उंची वाढवून आणि मजबुतीकरण करून १९६७ ते १९७३ या काळात पुन्हा धरणाच्या बांधकामात सुधारणा करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा उजवा व डावा या दोन्ही पाताखालील क्षेत्र वाढविण्यात आले आहे.