Jump to content

परिनिर्वाण स्तूप

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धार्मिक वास्तू


नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
परिनिर्वाण विहार

परिनिर्वाण स्तूप हा उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर येथील एक बौद्ध विहार आहे. हे ठिकाण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.[] याला महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही संबोधिले जाते.[][] अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, व गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध केले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग)च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत उत्तर दिशेला उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने निद्रावस्थेत पडलेली दिसते. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडी पलंगावर ठेवलेला आहे.[]

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

बुद्धांच्या ह्या वर्षांच्या धम्मप्रचाराच्या घडामोडीनंतर, बुद्ध गंभीर अवस्थेत कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला आपले शेवटचे शब्द उच्चारून इ.स.पू. ४८४ मध्ये महापरिनिर्वाण केले. मौर्य राजा अशोक यांनी इ.स.पू. २६० मध्ये कुशीनगरला भेट दिली व तेथे त्यांनी बुद्धांच्या निर्वाणाच्या स्थानाशी संबंधित अनेक पवित्र स्थळे - चैत्येस्तूपे बांधली.[] पुढे कुषाण साम्राज्याच्या दरम्यान कुशीनगरचे महत्त्व वाढले, तर गुप्त साम्राज्याच्या काळात (इ.स. ३२० - ६४७ मध्ये) कुशीनगरने सुवर्णयुग पाहिले. तेव्हा ह्या परिनिर्वाण स्तूपाचा मोठा विस्तार होऊन त्यात विशाल बुद्ध पुतळा स्थापून परिनिर्वाण विहार पुनः उभारला गेला. कुशीनगर येथील हा विहार इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून पवित्र स्थळ म्हणून मान्यता पावला आहे.[]

साचा:Wide image

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:स्रोत पुस्तक
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. Akira Hirakawa; Paul Groner (1993). A History of Indian Buddhism: From Śākyamuni to Early Mahāyāna. Motilal Banarsidass. p. 101. ISBN 978-81-208-0955-0.
  6. Lars Fogelin (2015). An Archaeological History of Indian Buddhism. Oxford University Press. pp. 23–24. ISBN 978-0-19-994822-2.