ब्रह्मपुरी
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचे शहर आहे. हे शहर असून जिल्ह्यात अतिशय शांत शहर म्हणून ओळख असलेले हे शहर, जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर वसले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, परिसरात शिक्षणाचे माहेरघर अशी ब्रम्हपुरी शहराची ओळख आहे. शिवाय वैद्यकीय सेवेसाठी शहराचा परिसरामध्ये लौकिक आहे. शहराच्या वाढत्या विकासामुळे परिसरातील लोक शहराच्या प्रेमात पडून येथेच वस्ती करून राहतात त्यामुळे शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.
इतिहास संपादन
१८५४मध्ये जेव्हा स्वतंत्र चांदा (सध्याचे चंद्रपूर) जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, तेव्हा १८७४मध्ये ब्रम्हपुरी तालुक्याची बनला. सुरुवातीला चांदा जिल्ह्यामध्ये केवळ वरोरा, मूल, ब्रम्हपुरी आणि चांदा तालुक्यांचाच समावेश होता. त्यानंतर १९०५ मध्ये चांदा आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील जमीनदारी मालमत्ता हस्तांतरित करून गडचिरोली हा नव्या तालुका निर्माण झाला.
ब्रम्हपुरी शहरामध्ये इंग्रजांच्या काळातील टेनिस क्लब आहे. तसेच ब्रिटिश काळातील अनेक वास्तू शहराच्या पारतंत्र्यापूर्वी असणाऱ्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत मोठ्या थाटात उभ्या आहेत. या शहराच्या चारही बाजूंनी १०० कि.मी.पर्यंत कोणतेही मोठे शहर नाही.
गेल्या अनेक दशकांपासून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्ह्याचे विभाजन करून नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. परंतु राजकीय दबावामुळे असो, वा प्रशासकीय सोयीसाठी एका रात्रीतूनच निर्णय बदलला गेला आणि ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली हा नवा जिल्हा बनला.
ब्रम्हपुरी तालुक्याचे अनेक वेळा विभाजन करण्यात आले. त्यावेळी नव्या गडचिरोली तालुक्याची स्थापना, नव्या सिंदेवाही - सावली - नागभीड तालुक्यांची स्थापना झाली. ब्रम्हपुरी येथे चंद्रपूर जिल्ह्याचा प्रशासकीय उपविभाग आहे. यामध्ये पूर्वी नागभीड, सिंदेवाही आणि सावली आणि ब्रम्हपुरी तालुक्यांचा समावेश असायचा; परंतु आता त्यात केवळ नागभीड आणि ब्रम्हपुरी हे तालुके आहेत.
भूगोल व हवामान संपादन
ब्रम्हपुरी शहर समुद्रसपाटीपासून २३० मीटर उंचीवर आहे. शहराचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे. उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा ४७°C पर्यंत जातो तर हिवाळ्यामध्ये ७°C पर्यंत खाली घसरतो.
ब्रम्हपुरी शहरामध्ये पर्जन्याचे प्रमाण खूप आहे, एका दिवसात २०२ मिलिमीटर पर्जन्याचा विक्रम १३ जुलै २०१३ रोजी नोंदविण्यात आला, यापूर्वी २४ तासातील केवळ १३१ मिलिमीटर पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर पाण्याखाली आले होते, तेव्हा ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडूनही ब्रम्हपुरी शहरामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली नाही, इथे कितीही पाऊस पडला तरी ब्रम्हपुरीत पूरस्थिती उद्भवत नाही हे ब्रम्हपुरी शहराचे वैशिष्ट्य आहे.
लोकसंख्या संपादन
सन २००१ च्या शिरगणतीनुसार ब्रम्हपुरीची लोकसंख्या ३१,२०७ इतकी आहे.
पर्यटन संपादन
पर्यटनाच्या बाबतीत हा परिसर मागासलेला असला तरी गेल्या काही वर्षातील घडामोडी लक्षात घेता महाराष्ट्र शासन सुद्धा या भागामध्ये पर्यटनाचा विकास करण्यात उत्सुक आहे असे दिसते. ब्रम्हपुरी शहराच्या वायव्य सीमेवर वसलेल्या धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी नामक संस्थेला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. त्या क्षेत्राचा विकासही पर्यटन स्थळ म्हणून होताना दिसत आहे. धम्मभूमी परिसर हा उपवन संरक्षक, वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या सरकारी बंगल्याच्या मागे शिवाजी नगर मार्गावर आहे.
शहरामध्ये तीन तलाव आहेत. ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रामध्ये दाट वस्ती असल्यामुळे शहरात एकही मोकळे मैदान नाही, की जिथे उद्यान करता येईल.
उत्सव संपादन
हिंदू, बौद्ध व इस्लाम हे शहरातील लोकांचे प्रमुख धर्म आहेत. तसे असले तरी या शांतताप्रिय शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सण - उत्सवांमध्ये सहभागी होत असतात.
गणपती उत्सव संपादन
ब्रम्हपुरीमध्ये गणेश उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातो. या गणपती उत्सवाला "ब्रम्हपुरीचा राजा" असे म्हणतात. गणेश उत्सव हा ब्रम्हपुरीकरांसाठी खूप मनोरंजनाचा आणि उत्साहाचा असतो, या उत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक असतात. ब्रम्हपुरी सभोवतातील गावांजवळील आणि सभोवतालील नागरिक हा गणेशोत्सव बघायला येतात.
बौद्ध सण व उत्सव संपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व समता सैनिक दल, ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्धापन सोहळा वगैरे दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी, ब्रम्हपुरीद्वारे धम्म कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहराच्या प्रत्येक भागातून रात्री भव्य फेऱ्या काढल्या जातात व ब्रह्मपुरीतल्या भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला वंदन करून परत जातात. तर गेल्या काही वर्षांपासून या दिवशी २४ तास अभ्यासस्पर्धेचे आयोजन केले जाते.
ख्रिस्ती सण व उत्सव संपादन
शहरातील लोकांना ख्रिस्ती सणांचे कायम आकर्षण राहिले आहे. शहरामध्ये ख्रिस्ती लोकसंख्या अतिशय विरळ असली, तरी नाताळाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तांचे दर्शन घेण्यासाठी चर्चमध्ये खूप गर्दी असते. ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट स्कूल आणि ख्रिस्तानंद रुग्णालयात ख्रिस्त जन्मानिमितत्त भरलेल्या प्रदर्शनात बघ्यांची गर्दी असते.
हिंदु सण व उत्सव संपादन
ब्रम्हपुरीकरांचा प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव. सर्व ब्रम्हपुरीकर गणेशोत्सवाची वर्षभर वाट बघत असतात. माजी आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले ने. हि. गणेशोत्सव मंडळ ही दोन प्रमुख गणेशोत्सव मंडळे आहेत.
शहराबद्दल संपादन
- ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार हे आहेत.
- ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष रिताताई ऊराडे आहेत.
शिक्षण संपादन
ब्रह्मपुरी शहराला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते.
शिक्षणसंस्था संपादन
- नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
- इन्स्पायर करिअर अकॅडमी : स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी संस्था