चंद्र जेव्हा सूर्यापासूनपृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेसपौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो.[१] पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो.
वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते. जर चंद्रावर पडलेली पृथ्वीची छाया ही उपछाया असेल तर होणाऱ्या ग्रहणाला छायाकल्प ग्रहण म्हणतात. हे ग्रहण डोळ्यांना जाणवत नाही.
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे तीन-चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो.
याच नियमाने २१व्या शतकात २००२ ते २००६; २०१६ ते २०; २०२७ ते ३१ .......या कालखंडांत चंद्रग्रहणे नसतील.
२०व्या शतकापासून ते ३०व्या शतकापर्यंतच्या काळात १२,०६४ चंद्रग्रहणे होती/असतील