स्वराज्यरक्षक संभाजी
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९च्या मालिका
स्वराज्यरक्षक संभाजी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनप्रवासावरची मालिका होती. हिची कथा प्रतापराव गंगावणे यांनी लिहिली होती.
कलावंत संपादन
- अमोल कोल्हे - छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले
- दिवेश मेडगे - बाल संभाजी महाराज
- आभा मोडक - बाल येसूबाई
- शंतनू मोघे - छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले
- आर्यन मेघंजी / ओम चेंदणे / प्रज्ञेश तारी - छत्रपती राजाराम शिवाजीराजे भोसले
- प्राजक्ता गायकवाड - महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले / येसूबाई पिलाजीराव शिर्के
- मृगा बोडस - महाराणी ताराबाई राजारामराजे भोसले / ताराबाई हंबीरराव मोहिते
- पूर्वा गोखले - [[सईबाई भोसले|महाराणी सईबाई शिवाजीराजे भोसले / सईबाई निंबाळकर
- स्नेहलता तावडे-वसईकर - महाराणी/राजमाता सोयराबाई शिवाजीराजे भोसले / सोयराबाई मोहिते
- पल्लवी वैद्य - महाराणी पुतळाबाई शिवाजीराजे भोसले / पुतळाबाई पालकर
- वेदाश्री दाली / शर्वरी जमेनीस - महाराणी सकवारबाई गायकवाड / सकवारबाई शिवाजीराजे भोसले
- तन्वी कुलकर्णी - महाराणी सगुणाबाई शिवाजीराजे भोसले / सगुणाबाई शिर्के
- प्रतीक्षा लोणकर - राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले / जिजाबाई लखुजीराव जाधवराव
- लतिका सावंत - धाराऊ पाटील
- अश्विनी महांगडे - राणूबाई शिवाजीराजे भोसले / राणूबाई कृष्णाजी जाधव
- महेश कोकाटे - अनाजी दत्तो
- सतीश सलगरे - सोमाजी दत्तो
- नंदकुमार पाटील - मोरोपंत पिंगळे
- रविंद्र कुलकर्णी - न्यायाधीश निराजी रावजी
- सतीश आगाशे / नासिर खान - चिटणीस बाळाजी आवजी चित्रे
- अनिल गवस - सरसेनापती हंबीरराव मोहिते
- अमित बेहल - औरंगजेब
- आनंद काळे - कोंडाजी फर्जंद
- सुमीत पुसावळे - हर्जीराजे महाडिक
- रमेश रोकडे - हिरोजी फर्जंद
- अजय तपकिरे - बहिर्जी नाईक
- प्रिया मराठे - गोदावरी
- राहुल मेहेंदळे - कवी कलश
- विजय आंदळकर - कृष्णाजी जाधव
- किशोर महाबोले - फिरंगोजी नरसाळे
- स्वरांगी मराठे - लवंगीबाई
- अमृता मालवडकर - अंबिकाराजे महाडिक
- अमित भानुशाली - अकबर बादशाह
- कौशिक कुलकर्णी - निळोपंत पेशवे
विशेष भाग संपादन
- एक मावळा म्हणजे दहा हत्तींचे बळ, आपले शंभर तर त्यांचे लाख, मरेपर्यंत मर्दा आया-बहिणींची अब्रू राख, हर हर महादेव! (२४ सप्टेंबर २०१७)
- धगधगता लाव्हा, स्वराज्याचा छावा. (२६ सप्टेंबर २०१७)
- शिवशाहीतील खेळ खेळत जिजाऊ संभाजींना देणार गनिमी काव्याचा धडा. (२९ सप्टेंबर २०१७)
- मोठ्या रुपात सज्ज रक्षण्या स्वराज्य. (१७ डिसेंबर २०१७)
- कुटुंबवत्सल पिता की कर्तव्यकठोर छत्रपती, कुणाच्या बाजूने झुकणार नियती? (१५ एप्रिल २०१७)
- पिता-पुत्रातला बंद दारामागचा संवाद राहणार का गुप्त? (०१ मे २०१८)
- छत्रपती विरुद्ध पित्याच्या द्वंद्वात होणार छत्रपतींचा विजय! (०३ मे २०१८)
- दिलेरखानाचा शंभूराजांवर तलवारीऐवजी लेखणीचा वार. (०६ मे २०१८)
- शंभूराजे दिलेरखानाच्या खलित्याला लेखणीने उत्तर देणार की तलवारीने? (०८ मे २०१८)
- शंभूराजे-येसूबाईंच्या नवीन प्रवासाला शृंगारपुरी सुरुवात. (१० मे २०१८)
- दिलेरखानाला पडू लागली आहेत शंभूराजांची स्वप्नं, काय असेल त्याची पुढची चाल? (१३ मे २०१८)
- रायगडी शंभूराजांविषयी गैरसमज पसरवण्यात दिलेरखान होणार का यशस्वी? (१५ मे २०१८)
- दिलेरखानाच्या लेखणीला शंभूराजांचं खणखणीत उत्तर. (१७ मे २०१८)
- रायगडाहून आलेले आदेश शंभूराजे धुडकावणार. (२० मे २०१८)
- शिवस्वरूप बाबांच्या खलित्यामुळे उठणार गैरसमजाचं वादळ. (२२ मे २०१८)
- शंभूराजे करु शकणार का येसूबाईंच्या शंकांचं निरसन? (२४ मे २०१८)
- अखेरीस येसूबाईंसमोर येणार शिवस्वरूप बाबांचं सत्य. (२७ मे २०१८)
- अखेर सोयराबाई आणि शंभूराजे येणार आमने-सामने, दूर होतील का त्यांच्यातले सगळे गैरसमज? (२९ मे २०१८)
- शंभूराजांमुळे अपुरे राहणार का येसूबाईंचे डोहाळे? (३१ मे २०१८)
- सोयराबाईंचा तडकाफडकी रायगडी परतण्याचा निर्णय, शंभूराजे त्यांना थांबवण्यात यशस्वी होतील का? (१० जुलै २०१८)
- शंभूराजांचा अभिषेक रायगडी आणणार असंतोषाचे वारे. (१२ जुलै २०१८)
- शंभूराजांना येणार महाराजांचा खलिता, कुठे होणार या दोघांची भेट? (१४ जुलै २०१८)
- शंभूराजे सहन करु शकतील का या अपेक्षाभंगाचं दुःख? (१७ जुलै २०१८)
- शिवाजी महाराजांचा निर्णय टाकणार शंभूराजांना संभ्रमात. (१९ जुलै २०१८)
- मनावर दगड ठेवून शंभूराजे स्वीकारणार का दिलेरखानाच्या मैत्रीचा प्रस्ताव? (२२ जुलै २०१८)
- दिलेरखानाच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकणार का शिवबाचा छावा? (०९ डिसेंबर २०१८)
- शंभूराजे करणार अनाजी पंतांना जेरबंद, काय होणार ह्याचा परिणाम? (११ डिसेंबर २०१८)
- शंभूराजे सोडवू शकणार का हा नात्यांचा तिढा? (१३ डिसेंबर २०१८)
- घाव झेलत डाव उधळत रुद्र शंभूराजे रायगडी येणार. (१५ डिसेंबर २०१८)
- कबुली जबाब की शिक्षा, कशाने होणार ह्या संघर्षाचा शेवट? (०९ एप्रिल २०१९)
- सुरू होणार शंभूराजांच्या आयुष्यातील नवा अध्याय, ते होणार स्वराज्याचे छत्रपती. (११ एप्रिल २०१९)
- शंभूराजे विराजमान होणार स्वराज्याच्या सिंहासनावर, रायगड बनणार आनंदाचे गोकुळ. (१३ एप्रिल २०१९)
- रायगडी फडकणार चैतन्याचे भगवे, शंभूराजे बनणार स्वराज्याचे दुसरे छत्रपती. (१९ मे २०१९)
- एकीकडे भवानीबाईंच्या लग्नाची वरात आणि दुसरीकडे औरंगजेबाचा जनाझा, शंभूराजे कसं पार पाडणार हे अग्निदिव्य? (२७ ऑक्टोबर २०१९)