झी मराठी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाहिनी

झी मराठी ही झी नेटवर्क समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी अल्फा टीव्ही मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. झी मराठी एचडी वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. दरवर्षी काही महिन्यांच्या रविवारी झी मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.

माहिती

सुरुवातीला या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे. पण ०१ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात केली. तसेच २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारी १ ते २ हा नवा प्राईम टाइम सुरू केला होता. परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. झी मराठी वाहिनीने जय मल्हार आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत.

कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२०ला बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते.

मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी स्वरतरंग हा कार्यक्रम आयोजित करते. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. मनोरंजनाचा अधिकमास याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात.

झी मराठी वाहिनीने झी मराठी दिशा हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ०९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले. परंतु काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच खाली डोकं वर पाय (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), सुखकर्ता (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि उत्सव नात्यांचा (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केलीत. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला.

दीर्घमालिका

  1. वेध भविष्याचा (६२५२ एपिसोड ३१ जानेवारी २०२२ पर्यंत १७ वर्षे पूर्ण)
  2. होम मिनिस्टर (५००० एपिसोड ०९ एप्रिल २०२२ पर्यंत १७ वर्षे पूर्ण)
  3. आम्ही सारे खवय्ये (३३९० एपिसोड २० ऑक्टोबर २०२० पर्यंत १३ वर्षे पूर्ण)
  4. माझ्या नवऱ्याची बायको (१३५४ एपिसोड ०७ मार्च २०२१ पर्यंत ४ वर्षे पूर्ण)
  5. तुझ्यात जीव रंगला (१२६२ एपिसोड ०२ जानेवारी २०२१ पर्यंत ४ वर्षे पूर्ण)
  6. अवघाचि संसार (११६९ एपिसोड २४ एप्रिल २०१० पर्यंत ४ वर्षे पूर्ण)
  7. चला हवा येऊ द्या (८८७ एपिसोड ०५ एप्रिल २०२२ पर्यंत ७ वर्षे पूर्ण)

प्रसारित मालिका

सोम-शनि

कथाबाह्य कार्यक्रम

नवीन मालिका

  • लवकरच... सत्यवान सावित्री

जुन्या मालिका

  1. १०० डेझ
  2. ४०५ आनंदवन
  3. अधुरी एक कहाणी
  4. आभास हा
  5. अभिलाषा
  6. अग्निपरीक्षा
  7. आक्रित
  8. अल्फा स्कॉलर्स
  9. अल्फा बातम्या
  10. अजूनही चांदरात आहे
  11. आम्ही सारे खवय्ये
  12. आभाळमाया
  13. अग्गंबाई सासूबाई
  14. अग्गंबाई सूनबाई
  15. अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
  16. अमरप्रेम
  17. आमच्यासारखे आम्हीच
  18. आम्ही ट्रॅव्हलकर
  19. आमने सामने
  20. अंकुर
  21. अर्थ
  22. असा मी तसा मी
  23. अनुबंध
  24. अरुंधती
  25. असे हे कन्यादान
  26. असंभव
  27. अस्मिता
  28. अवघाचि संसार
  29. अवंतिका
  30. बंधन
  31. बुक शेल्फ
  32. बुवा आला
  33. बोल बाप्पा
  34. बाजी
  35. भागो मोहन प्यारे
  36. भाग्यलक्ष्मी
  37. भाग्याची ही माहेरची साडी
  38. भटकंती
  39. चक्रव्यूह एक संघर्ष
  40. चूक भूल द्यावी घ्यावी
  41. कॉन्स्टेबल कामना कामतेकर
  42. कॉमेडी डॉट कॉम
  43. क्रिकेट क्लब
  44. शेफ व्हर्सेस फ्रीज
  45. डार्लिंग डार्लिंग
  46. दे धमाल
  47. डिटेक्टिव्ह जय राम
  48. देवमाणूस
  49. दिल दोस्ती दुनियादारी
  50. दिल दोस्ती दोबारा
  51. दिल्या घरी तू सुखी राहा
  52. दिलखुलास
  53. डिस्कव्हर महाराष्ट्र
  54. दुहेरी
  55. दुनियादारी
  56. एक हा असा धागा सुखाचा
  57. एक गाव भुताचा
  58. एका लग्नाची दुसरी गोष्ट
  59. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  60. एकाच ह्या जन्मी जणू
  61. एका श्वासाचे अंतर
  62. गहिरे पाणी
  63. घडलंय बिघडलंय
  64. घरात बसले सारे
  65. गुडमॉर्निंग महाराष्ट्र
  66. गीतरामायण
  67. घेतला वसा टाकू नको
  68. गाव गाता गजाली
  69. गाव गाता गजाली २
  70. ग्रहण
  71. गुंतता हृदय हे
  72. हा कार्यक्रम बघू नका!
  73. हसा चकट फू
  74. हाऊसफुल्ल
  75. होम स्वीट होम
  76. होम मिनिस्टर
  77. होणार सून मी ह्या घरची
  78. हम तो तेरे आशिक है
  79. इंद्रधनुष्य
  80. जागो मोहन प्यारे
  81. जाडूबाई जोरात
  82. जावई विकत घेणे आहे
  83. जगाची वारी लयभारी
  84. जगावेगळी
  85. जल्लोष गणरायाचा
  86. जिभेला काही हाड
  87. जोडी नं.१
  88. जय मल्हार
  89. जुळून येती रेशीमगाठी
  90. का रे दुरावा
  91. काहे दिया परदेस
  92. कळत नकळत
  93. कारभारी लयभारी
  94. काय घडलं त्या रात्री?
  95. कथाकथी
  96. खरंच माझं चुकलं का?
  97. किनारा
  98. कोपरखळी
  99. क्या बात है!
  100. खुलता कळी खुलेना
  101. कुलवधू
  102. कुंकू
  103. लज्जा
  104. लागिरं झालं जी
  105. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
  106. लाडाची मी लेक गं!
  107. लक्ष्मणरेषा
  108. माझा होशील ना
  109. मालवणी डेज
  110. मला सासू हवी
  111. माझे पती सौभाग्यवती
  112. मिसेस मुख्यमंत्री
  113. माझ्या नवऱ्याची बायको
  114. माझिया प्रियाला प्रीत कळेना
  115. मस्त महाराष्ट्र
  116. मानसी तुमच्या घरी
  117. मेघ दाटले
  118. मिसाळ
  119. मिशा
  120. मृण्मयी
  121. मुंबई पोलीस
  122. नाममात्र
  123. नकटीच्या लग्नाला यायचं हं
  124. नांदा सौख्य भरे
  125. नमस्कार अल्फा
  126. नायक
  127. नुपूर
  128. ऊन पाऊस
  129. पसंत आहे मुलगी
  130. पाहिले नं मी तुला
  131. पिंजरा
  132. पतंजलि योग
  133. पेशवाई
  134. पिंपळपान
  135. पोलीस फाईल्स
  136. प्रदक्षिणा
  137. प्रपंच
  138. राम राम महाराष्ट्र
  139. रिमझिम
  140. रेशीमगाठी
  141. ऋणानुबंध
  142. राधा ही बावरी
  143. रात्रीस खेळ चाले
  144. रात्रीस खेळ चाले २
  145. रात्रीस खेळ चाले ३
  146. साडे माडे तीन
  147. साहेब, बीबी आणि मी
  148. साईबाबा
  149. सांजभूल
  150. सूरताल
  151. शॉपिंग शॉपिंग
  152. श्रावणसरी
  153. श्रीयुत गंगाधर टिपरे
  154. शेजारी शेजारी पक्के शेजारी
  155. शुभं करोति
  156. स्वराज्यरक्षक संभाजी
  157. सावित्री
  158. ती परत आलीये
  159. टोटल हुबलाक
  160. तू तिथे मी
  161. तुझं माझं ब्रेकअप
  162. तुला पाहते रे
  163. तुझ्यात जीव रंगला
  164. तुझं माझं जमेना
  165. थरार
  166. तुंबाडचे खोत
  167. तुझ्याविना
  168. युनिट ९
  169. उंच माझा झोका
  170. वहिनीसाहेब
  171. वादळवाट
  172. वारस
  173. वाजवू का?
  174. व्यक्ती आणि वल्ली
  175. वस्त्रहरण
  176. या सुखांनो या
  177. येऊ कशी तशी मी नांदायला
  178. युवा
  179. झी न्यूज मराठी
  180. झाले मोकळे आकाश
  181. झाशीची राणी
  182. झुंज

कथाबाह्य कार्यक्रम

  1. सा रे ग म प:लिटील चॅम्प्स (१४ पर्वे)
  2. फू बाई फू (८ पर्वे)
  3. एका पेक्षा एक (७ पर्वे)
  4. तुफान आलंया (३ पर्वे)
  5. हप्ता बंद (२ पर्वे)
  6. खुपते तिथे गुप्ते (२ पर्वे)
  7. मराठी पाऊल पडते पुढे (२ पर्वे)
  8. डान्स महाराष्ट्र डान्स (२ पर्वे)
  9. हास्यसम्राट (२ पर्वे)
  10. महाराष्ट्राचा सुपरस्टार (२ पर्वे)
  11. मधु इथे अन् चंद्र तिथे
  12. हे तर काहीच नाय
  13. तुमचं आमचं जमलं
  14. झिंग झिंग झिंगाट
  15. कानाला खडा
  16. अळी मिळी गुपचिळी
  17. डान्सिंग क्वीन
  18. याला जीवन ऐसे नाव
  19. महाराष्ट्राची लोकधारा
  20. डब्बा गुल
  21. मधली सुट्टी

ॲप्लिकेशन्स

झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत.

  1. झी मराठी ॲप (ओझी ॲप / झी फाईव्ह ॲप)
  2. तुमचं आमचं जमलं ॲप
  3. होम मिनिस्टर ॲप
  4. किसान अभिमान ॲप
  5. टॅलेंट ॲप

नाटक

झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली.

  1. हॅम्लेट
  2. आरण्यक
  3. नटसम्राट
  4. अलबत्या गलबत्या
  5. एका लग्नाची पुढची गोष्ट
  6. तिला काही सांगायचंय!
  7. इडियट्स
  8. राजाला जावई हवा
  9. कापूसकोंड्याची गोष्ट
  10. झुंड
  11. तीसरे बादशाह हम!
  12. इब्लिस

रिॲलिटी शो

झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत.

चला हवा येऊ द्या

साचा:मुख्य निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.

फू बाई फू

फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याचे पहिले पर्व २०१० मध्ये सादर झाले होते. याची ८ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, इत्यादी पर्वे होती. निलेश साबळे हा सूत्रसंचालक आणि अश्विनी काळसेकर, निर्मिती सावंत, महेश कोठारे, रेणुका शहाणेस्वप्निल जोशी या सर्वांनी परिक्षणाचे काम केले होते.

सा रे ग म प

"सा रे ग म प" या कार्यक्रमाने तब्बल १३ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. पल्लवी जोशी हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे :-

  • स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा अभिजीत कोसंबी याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे ऊर्मिला धनगर ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका देवकी पंडित, रॉकस्टार अवधूत गुप्ते, संगीतकार अजय-अतुल इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले.
  • स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला.
  • लिटिल चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला लता मंगेशकर यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटिल चॅंप्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे
  • अलिबागची लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन
  • आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड
  • लातूरचा म्युझिक डायरेक्टर रोहित राऊत
  • पुण्याची ॲंग्री यंगगर्ल आर्या आंबेकर
  • रत्‍नागिरीचा उकडीचा मोदक प्रथमेश लघाटे

या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या केतकी माटेगांवकरने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका वैशाली सामंत व गायक-संगीतकार अवधूत गुप्ते या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प" ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये सेलिब्रिटी स्पेशल, प्रोफेशनल स्पेशल, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

हास्यसम्राट

या कार्यक्रमाची एकूण २ पर्व सादर झाली. पहिल्या पर्वाचे सोलापूरचे दीपक देशपांडे हे विजेते झाले, तर दुसऱ्या पर्वाचे मिरजचे अजित कोष्टी हे विजेते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी याने केले. तर परीक्षक म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे व कवी अशोक नायगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली.

पुरस्कार सोहळे

वर्ष पुरस्कार संदर्भ
२००० – चालू झी चित्र गौरव पुरस्कार [१]
२०१५ – २०२० झी नाट्य गौरव पुरस्कार [२]
२००४ – चालू झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार [३]
२०१३ – २०१९ उंच माझा झोका पुरस्कार [४]

संदर्भ

साचा:संदर्भयादी