एका लग्नाची दुसरी गोष्ट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही २०१२ साली झी मराठी वरून प्रक्षेपित झालेली मराठी मालिका आहे. १६ जानेवारी २०१२पासून हिच्या प्रक्षेपणास सुरुवात झाली.[१] १९२ भागांनंतर २५ ऑगस्ट २०१२ रोजी अखेरचा भाग प्रक्षेपित होऊन ही मालिका संपली.[२] सतीश राजवाडे याने या मालिकेचे दिग्दर्शन केले असून स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, उमेश कामत, विनय आपटे, विवेक लागू, इला भाटे इत्यादी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले होते.

कथानक

घनश्याम श्रीपाद काळे आणि राधा महेश देसाई (विवाहोत्तर राधा घनश्याम काळे) हे अनुक्रमे नायक व नायिका असलेल्या पात्रांभोवती मालिकेचे कथानक गुंफले आहे. घनश्याम आणि राधा सुरुवातीस एकमेकांना ओळखत नसतात. पेशाने घनश्याम सॉफ्टवेअर अभियंता असतो, तर राधा चित्रकारसाचा:संदर्भ हवा असते. दोघांचेही कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी स्थळे बघत असतात. घनश्याम व राधा या दोघांनाही लग्न करावेसे वाटत नसते; मात्र कुटुंबियांच्या नातेसंबंधांच्या दबावापुढे ते आपला विचार उघडपणे मांडू शकत नसतातसाचा:संदर्भ हवा.

योगायोगाने काही गोष्टी अशा जुळून येतात, की घनश्याम व राधा यांची विवाह-टिपणे त्यांच्या कुटुंबियांच्या हाती लागतात व त्यातून त्या दोघांची भेट घडवून स्थळ बघण्याचा कार्यक्रम जुळवून आणला जातो. त्या दोघांनाही एकमेकांच्या लग्न न करण्याच्या इच्छेचा या भेटीमुळे उलगडा लागतो आणि त्यातून त्या दोघांना एक शक्कल सुचते. कुटुंबियांचे मन न मोडता, लग्न करण्याविषयीच्या त्यांच्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी आधी एकमेकांशी लग्न करायचे; पण लग्नानंतर अल्पावधीतच घटस्फोट घेऊन मोकळे व्हायचे, असा त्या दोघांमध्ये ठराव ठरतो. त्यानुसार घनश्याम व राधा लग्नास संमती देतात. काळे आणि देसाई कुटुंबे त्यांचे लग्न थाटामाटात लावून देतात.

मात्र लग्नानंतर राधा काळे कुटुंबात आल्यानंतर, दोघे नकळत एकमेकांमध्ये गुंतत जातात. पण तरीही ठरवल्याप्रमाणे एकमेकांशी घटस्फोट घेण्याचे विचारही त्यांच्या मनी टिकून असल्यामुळे त्यांना पुढील काळात भावनिक आंदोलनांना तोंड द्यावे लागते. अखेरीस परिस्थितीस मिळालेल्या कलाटणीमुळे, तसेच कुटुंबियांच्या पूरक प्रयत्नांमुळेच घनश्याम व राधा दोघांनाही परस्परांविषयीच्या ओढीचा प्रामाणिक साक्षात्कार घडतो आणि ते दोघेही घटस्फोट न घेता संसारात सुखाने रमतात.

पात्रयोजना

पात्राचे नाव कलाकार नाते/टिप्पणी
घन:श्याम काळे स्वप्नील जोशी नायक
राधा काळे (पूर्वाश्रमीचे नाव: राधा महेश देसाई) मुक्ता बर्वे नायिका
महेश देसाई विनय आपटे राधाचे वडील
माई काळे रेखा कामत घन:श्यामची आजी
श्रीपाद काळे मोहन जोशी (आधी)‌
विवेक लागू (नंतर)
घन:श्यामचे वडील
देवकी काळे इला भाटे घन:श्यामची आई
वल्लभ काळे मिलिंद फाटक घन:श्यामचा थोरला काका
वल्लरी वल्लभ काळे मंजुषा गोडसे घन:श्यामची थोरली काकू
दिगंबर काळे सुनील अभ्यंकर घन:श्यामाचा धाकटा काका
सुप्रिया दिगंबर काळे लीना भागवत घन:श्यामची धाकटी काकू
प्राची आत्या सुकन्या मोने राधाची इंदूर येथे राहणारी आत्या
अबीर रानडे उमेश कामत महेश देसाईंच्या घरी राहणारा भाडेकरु
उल्का आत्या आसावरी जोशी घनश्यामची आत्या
कुहू काळे स्पृहा जोशी घन:श्यामची चुलतबहीण (वल्लभ-वल्लरी यांची मुलगी)
प्रभात श्रीकर पित्रे कुहूचा प्रियकर
ज्ञानेश काळे मोहित गोखले घन:श्यामचा चुलतभाऊ (वल्लभ-वल्लरी यांचा मुलगा)
माऊली सतीश तारे काळे कुटुंबातील घरगुती नोकर
सोनावणे सर हृशिकेश जोशी राधाचा बॉस
मानव गोखले संदीप पाठक राधाचा ऑफिसातील सहकारी

पुनर्निर्मिती

भाषा नाव प्रथम प्रसारण वाहिनी अखेर प्रसारण वेळ पुनर्निर्मिती
मराठी एका लग्नाची दुसरी गोष्ट १६ जानेवारी २०१२ झी मराठी २५ ऑगस्ट २०१२ ८:३० मूळ
हिंदी चुपके चुपके ८ मे २०१७ अँड टीव्ही[३] १५ सप्टेंबर २०१७ ६:३० पुनर्निर्मिती

माहिती

मालिकेच्या समाप्तीनंतरही त्याची लोकप्रियता प्रचंड होती.[४] नायक - राधा आणि घनश्याम यांच्यातील प्रेमकथेचे खूप कौतुक झाले. स्पृहा जोशी साकारलेल्या कुहूपासून इला भाटे यांनी साकारलेल्या आईपर्यंत या शोमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या शोला नेहमीच उच्च टीआरपी आणि प्रत्येकाकडून उत्तम टाळ्या मिळाल्या. त्याच्या लोकप्रियतेमुळे, झी मराठीने या मालिकेचे एका मिनी चित्रपटात रूपांतर केले आणि शोच्या स्मृतीत २० जानेवारी २०१३ रोजी प्रसारित केले, मिनी फिल्म एलदुगो- सिनेमॅटिक म्हणून ओळखली गेली. हा शो सर्वात जास्त पाहिला गेला आणि मराठी टेलिव्हिजन शो झाला.[५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:Cite web