Jump to content

सवाई माधवराव पेशवे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन साचा:माहितीचौकट राज्याधिकारी सवाई माधवराव किंवा माधवराव नारायण (अन्य नामभेद: दुसरा माधवराव) (जन्मः इ.स. १७७४ ; किल्ले पुरंदर, मराठा साम्राज्य - मृत्यू :इ.स. १७९५ ; शनिवारवाडा, पुणे, मराठा साम्राज्य) हा मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होता. याने इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हा पुत्र होता. सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणाऱ्या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास साताऱ्याच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:मराठा साम्राज्य साचा:पेशवे साचा:पुणे