न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.
एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११]
सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५]
दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०]
कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| कसोटी | एकदिवसीय | ||
|---|---|---|---|
| साचा:Cr[२२][२३] | साचा:Cr[२४] | साचा:Cr[२५][२६] | साचा:Cr[२७] |
- दुखापतीमुळे टीम साऊथीच्या ऐवजी मॅट हेन्रीची न्यू झीलंड कसोटी संघात निवड.[२८]
- पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मार्क क्रेगला उर्वरित मालिकेसाठी संघाबाहेर जावे लागले. त्याच्या जागी जीतन पटेलची निवड करण्यात आली.[२९]
- दुखापतग्रस्त लोकेश राहुलऐवजी गौतम गंभीरची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली[३०]
- आजारपणामुळे इशांत शर्माच्या ऐवजी जयंत यादवचा संघात समावेश करण्यात आला.[३०]
- बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी करुण नायरचा समावेश करण्यात आला.[३१]
- पाठीच्या दुखण्यामुळे भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दूल ठाकूरची संघात निवड करण्यात आली.[३२]
- आजारपणानंतर पूर्णपणे तंदरुस्त नसल्याने सुरेश रैनाचा शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात समावेश होऊ शकला नाही.[३३]
सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ ३०.० ३०.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत