Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[][][] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली.

एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[][] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११]

सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५]

दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०]

कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

कसोटी एकदिवसीय
साचा:Cr[२२][२३] साचा:Cr[२४] साचा:Cr[२५][२६] साचा:Cr[२७]

सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कसोटी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. साचा:संकेतस्थळ स्रोत
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. साचा:संकेतस्थळ स्रोत
  13. साचा:संकेतस्थळ स्रोत
  14. साचा:संकेतस्थळ स्रोत
  15. साचा:संकेतस्थळ स्रोत
  16. साचा:संकेतस्थळ स्रोत
  17. साचा:संकेतस्थळ स्रोत
  18. साचा:संकेतस्थळ स्रोत
  19. साचा:संकेतस्थळ स्रोत
  20. साचा:संकेतस्थळ स्रोत
  21. साचा:संकेतस्थळ स्रोत
  22. साचा:संकेतस्थळ स्रोत
  23. साचा:संकेतस्थळ स्रोत
  24. साचा:संकेतस्थळ स्रोत
  25. साचा:संकेतस्थळ स्रोत
  26. साचा:संकेतस्थळ स्रोत
  27. साचा:संकेतस्थळ स्रोत
  28. साचा:संकेतस्थळ स्रोत
  29. साचा:संकेतस्थळ स्रोत
  30. ३०.० ३०.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. साचा:संकेतस्थळ स्रोत
  32. साचा:संकेतस्थळ स्रोत
  33. साचा:संकेतस्थळ स्रोत