Jump to content

विभागीय परिषद

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:११, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: १२.५ MP पेक्षा जास्त आकार असणारी संचिका
भारतातील विभागीय परिषद

विभागीय परिषदे हे भारतातील सल्लागार मंडळे आहेत. राज्यांमध्ये आंतरसहकार्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भारतातील राज्यांना पाच विभागांमध्ये विभागलेले आहे. हे राज्य पुनर्रचना कायदा,१९५६ च्या भाग -३ च्या अंतर्गत तयार केले गेले .

या विभागीय परिषदांपैकी प्रत्येकाची सध्याची रचना खालीलप्रमाणे आहेः []

# नाव सदस्य राज्ये/केंद्रशासित प्रदेश मुख्यालय[]
१. उत्तर विभागीय परिषद चंदिगढ, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब आणि राजस्थान नवी दिल्ली
२. दक्षिणी विभागीय परिषद आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पाँडिचेरी, तमिळनाडू, तेलंगण, अंदमान आणि निकोबार (आमंत्रित) आणि लक्षद्वीप (आमंत्रित) चेन्नई
३. मध्य विभागीय परिषदl छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अलाहाबाद
४. पूर्व विभागीय परिषद बिहार, झारखंड, ओरिसा, आणि पश्चिम बंगाल कलकत्ता
५. पश्चिमी विभागीय परिषद दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, गोवा, गुजरात, आणि महाराष्ट्र मुंबई
६. ईशान्य परिषद अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा शिलाँग

ईशान्येकडची राज्ये कोणत्याही विभागीय परिषदेखाली येत नाहीत. त्यांच्या विशेष अडचणी आणि त्यांचे प्रश्न १९७१ सालच्या ईशान्य परिषद कायद्याद्वारे तयार केलेल्या ईशान्य परिषद नावाच्या वैधानिक मंडळाद्वारे सोडविले जातात.[] या परिषदेत मूळत: आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा यांचा समावेश होता ; नंतर सिक्कीम राज्याला देखील ईशान्य परिषद (दुरुस्ती) अधिनियम,२००२ नुसार २३ डिसेंबर २००२ रोजी अधिसूचित करण्यात आले.[]

अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप हे कोणत्याही विभागीय परिषदेचे सदस्य नाहीत.[] तथापि, ते सध्या दक्षिणी विभागीय परिषदेचे विशेष आमंत्रित आहेत.[]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी