आमगाव रेल्वे स्थानक
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक आमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे.येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[१]
आमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस
- शिवनाथ एक्सप्रेस[१]