गोंदिया रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गोंदिया जंक्शन हे भारत देशाच्या गोंदिया शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. गोंदिया शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे गोंदिया हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग गोंदियामधूनच जातो. गोंदिया-जबलपूर ह्या रेल्वेमार्गाचे पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर दिल्ली-चेन्नई गाड्या गोंदियामार्गे धावू शकतील. ह्यामुळे गोंदियाचे महत्त्व वाढीस लागण्याची क्षमता आहे.
गोंदियामधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस
- नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी एक्सप्रेस