अरुणोदय (वृत्तपत्र)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अरुणोदय हे ठाणे शहरातून प्रसिद्ध होणारे पहिले मराठी दैनिक होते.साचा:संदर्भ काशिनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केले.साचा:संदर्भ २२ जुलै १८६६ रोजी अरुणोदयचा पहिला अंक प्रकाशित झाला.साचा:संदर्भ मुंबईतील पहिल्या वर्तमानपत्रानंतर ३४ वर्षानंतर ठाण्यात वर्तमान पत्र सुरू झाले. ठाणे हे मुंबईच्या जवळ असून व रेल्वे सुविधा असूनही ठाण्यात वर्तमान पत्र निघण्यास खूप वर्षाचा काळ लोटला.साचा:संदर्भ

इतिहास

अरुणोदयचे संपादक फडके हे कोकणातील फणसे गावचे होते. त्यांनी पुण्याच्या एका दैनिकात जुळारी म्हणून काम केले होते. १८६५ साली त्यांनी ठाण्यात शिळाप्रेस क्रमांक १ च्या पोलीस चोकीजवळच्या चाळीत अरुणोदयची स्थापना केली. त्यांनी काढलेल्या छापखान्यातून सुरुवातीची ४ ते ५ वर्षे अरुणोदयचे अंक छापण्यात येत.साचा:संदर्भ त्याचवेळी अरुणोदय नावाने साप्ताहिक देखील सुरू करण्यात आले होते.साचा:संदर्भ साप्ताहिकाच्या संपादनाचे काम रघुनाथ शास्त्री पाहत. त्यांच्यानंतर रविवार १३ मार्चपासून अरुणोदय सुमारे ४५ वर्षे चालू होते.साचा:संदर्भ अरुणोदयचा वाचकवर्ग मुंबई-पुण्यासारखा सुधारलेला नव्हता आणि त्यास इंदुप्रकाशसारखा विद्वान लेखकवर्ग मिळाला नाही. या वर्तमानपत्राचा भर त्याकाळच्या रीतीनुसार बातम्यापेक्षा निबंधवजा लेखांवर असे. अरुणोदयातील लेख विद्वत्तेपेक्षा, सखोल विवेचनापेक्षा, जहाल राजकीय मतप्रणाली मांडणारे आढळतात. सन १८८५मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म होण्याआधी सुमारे २० वर्षे अरुणोदयात राजकारणावर व परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी कसे संघटित प्रयत्न व्हावयाला पाहिजेत याविषयीचे विवेचन व मार्गदर्शन असायचे.[१]

पहिला अंक

२२ जुलै १८६६ रोजी अरुणोदयचा पहिला अंक प्रकाशित झाला.साचा:संदर्भ काशिनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय वर्तमान पत्र सुरू केले. त्यावेळी अरुणोदय साप्ताहिकाचे संपादक म्हणून रघुनाथ शंकर शास्त्री हे काम पाहत होते.साचा:संदर्भ रघुनाथ शास्त्री यांच्यानंतर १३ मार्च १९०४ रोजीपासून काशिनाथ विष्णू फडके यांचे नाव संपादक म्हणून छापण्यात येऊ लागले.साचा:संदर्भ

संपादकीय मंडळ

  1. काशिनाथ विष्णू फडके
  2. रघुनाथ शंकर शास्त्री
  3. धोंडो काशिनाथ फडके

अभिनव कार्यपद्धती

जहाल मतप्रणालीच्या पुरस्काराप्रमाणे अरुणोदयाचे काही नवीन उपक्रमही उलेखनीय आहेत. ठिकठिकाणी बातमीदार नेमून त्यांच्या करवी बातम्या मिळविण्याच्या सध्याच्या बातमीसंस्थांच्या अभावी त्याकाळची वर्तमानपत्रे ही इंग्लिश वृतपत्रांतील वा समकालीन इतर वृत्तपत्रांतील बातम्यांवर आधारित वृतसार देत असत. अरुणोदय स्वतंत्र बातमीदारांकरवी बातम्या मिळवित असे. याशिवाय नव्या वर्षांच्या पहिल्या अंकात मागील वर्षातील लेखांची आद्याक्षरनुसार यादी अरुणोदयमध्ये देण्यात येत असे.साचा:संदर्भ

हिंदुपंच

अरुणोदयात जहाल राजकीय विचार प्रदर्शित केले जात.साचा:संदर्भ याशिवाय अरुणोदयाच्या चालकांनी लंडन येथील पंच व तशाच प्रकारच्या गुजराती पत्राप्रमाणे हिंदूपंच नावाचे एक विनोदी पत्र चालू केले होते. या पत्रात प्रचलित राजकीय घडामोडीचे चित्रमय दर्शन दिले जात असे. चित्रांच्या खाली सूचक वाक्ये घालून चित्रातील विनोद वा प्रचाराकडे विशेष लक्ष वेधले जात असे.साचा:संदर्भ नंतरच्या व्यंगचित्राप्रमाणे केवळ काही रेखांच्याद्वारे विशिष्ट अर्थ सूचित करण्याइतकी त्यावेळची चित्रे नसत. हिंदुपंच पत्राचा हा प्रयत्न होता. अरुणोदयाच्या जहाल विचारसरणीमुळे ब्रिटिश राजवटीने पत्राची मुस्कटदाबी केली.साचा:संदर्भ हवा सन १९११ मध्ये अरुणोदय पत्र व छापखाना सरकारी रोषाला बळी पडून बंद पडला.साचा:संदर्भ हवा

संदर्भ

साचा:संदर्भयादी