अ.भा. दलित नाट्य संमेलन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनांमुळे महाराष्ट्रातील दलित रंगभूमीला सार्वत्रिकतेचे, चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. तिची सुरुवात १९८४ मध्ये पुण्यातून झाली. पुढे विविध ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलने भरवण्यात आली. ही संमेलने किमान दहा वेळा भरली असावीत. यातील संमेलनाच्या पाच अध्यक्षांच्या भाषणांचे त्र्यंबक महाजन यांनी संपादित केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे[१]. या पहिल्या दहा नाट्य संमेलनांचा उल्लेख भि. शि. शिंदे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात आहे [२]. सदर समेलनांची थोडक्यात खाली आली आहे.

पहिले अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, पुणे, १९८४

या संमेलनात (२४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी १९८४) एकूण वीस लहानमोठ्या नाटकांचे वेगवेगळ्या भागांतून आलेल्या नाट्यसंचांनी प्रयोग सादर केले आणि सात परिसंवाद घेण्यात आले.

दुसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अहमदनगर, १९८५

  • स्वागताध्यक्ष : बाळासाहेब विखे पाटील
  • कार्याध्यक्ष : प्रा. रतनलाल सोनाग्रा
  • संमेलनाध्यक्ष : मधुसूदन गायकवाड

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ भीमशाहीर मा. भीमराव कर्डक यांच्या आणि संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवसांच्या या संमेलनात एकूण सहा परिसंवाद आणि बावीस नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. आंबेडकरी जाणिवेतून लिहिलेल्या आणि सादर केलेल्या दलितेतर नाट्यसंचांचे प्रयोग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

तिसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबाजोगाई, जि. बीड १९८६

  • उद्घाटन सोहळा दि. २३ मे १९८६
  • अध्यक्ष : प्रा. दत्ता भगत
  • उद्घाटक : राजेंद्रकुमारी वाजपेयी (केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री, भारत सरकार).
  • स्वागताध्यक्ष : खासदार सौ. केशरकाकू क्षीरसागर
  • प्रमुख पाहुणे : रजनीताई सातव (आरोग्य व समाजकल्याण राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)

या संमेलनात तीन परिसंवाद व पंचवीस छोटी-मोठी नाटके झाली. संमेलनाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व परिवहन मंत्री विलासराव देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक कार्य युवाकल्याण, क्रीडा, पर्यटन राज्यमंत्री अशोक पाटील, हे उपस्थित होते.

चौथे अ.भा. दलित नाट्य संमेलन, नागपूर १९८८

  • संमेलनाध्यक्ष : प्रेमानंद गज्वी
  • उद्घाटक : विजय तेंडुलकर
  • स्वागताध्यक्ष : खासदार बनवारीलाल पुरोहित
  • प्रमुख उपस्थिती प्रा. दत्ता भगत, भि.शि. शिदे, मधुसूदन गायकवाड, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. अविनाश डोळस, वामन निंबाळकर, राम जाधव. या संमेलनात तीन परिसंवाद आणि आठ छोट्या-मोठ्या नाटकांचे प्रयोग झाले. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील दलित नाट्य संचाचे नाट्य प्रयोग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

संमेलनाचा समारोप खासदार एन.के.पी. साळवे, खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पाचवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, नांदेड, १९९०

  • संमेलनध्यक्ष : प्रा. अविनाश डोळस
  • स्वागताध्यक्ष : डॉ. यशवंत मनोहर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
  • उद्घाटक : डॉ. भालचंद्र फडके, ज्येष्ठ दलित साहित्य समीक्षक व विचारवंत.

पाचव्या संमेलनात चार परिसंवाद आणि वीस छोट्या-मोठ्या नाटकांचे प्रयोग झाले.

सहावे अ.भा. दलित नाट्य संमेलन, नाशिक १९९२

  • स्वागताध्यक्ष : ॲड. रंगनाथ डोळस, नाशिक
  • उद्घाटक : मोहन वाघ, नाट्य निर्माता, मुंबई:
  • संमेलनाध्यक्ष : रामनाथ चव्हाण, पुणे

या संमेलनात चार परिसंवाद आणि छोट्या-मोठ्या वीस नाटकांचे प्रयोग झाले. एकपात्री प्रयोग आणि पथनाट्याचे अनेक प्रयोग रस्त्यांवर व चौकाचौकात सादर झाले.

सातवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, धुळे १९९३

  • स्वागताध्यक्ष : हेमंत मदाने, धुळे
  • उद्घाटक : स्वरूपसिंह नाईक
  • संमेलनाध्यक्ष : विजयकुमार गवई, पुणे.

या संमेलनात चार परिसंवाद आणि एकूण बावीस छोट्या-मोठ्या नाटकांचे प्रयोग झाले. समारोप समारंभ रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष यांच्या हस्ते झाला.

आठवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, चंद्रपूर १९९५

  • स्वागताध्यक्ष : श्रीमती विमलताई गडेकर
  • उद्घाटक : ॲड. रंगनाथ डोळस
  • संमेलनाध्यक्ष : प्रभाकर दुपारे, सहसंपादक दै. लोकमत, नागपूर.

नववे अ.भा. दलित नाट्य संमेलन, प्रवरानगर (अहमदनगर) १९९६

  • स्वागताध्यक्ष : बबनराव घोलप, अध्यक्ष महाराष्ट्रीय चर्मकार संघ, नाशिक
  • उद्घाटक : खासदार बाळासाहेब विखे पाटील
  • संमेलनाध्यक्ष : विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर.

या संमेलनात तीन परिसंवाद आणि सोळा नाटकांचे सादरीकरण झाले; निबंध वाचन आणि पथनाट्याचे प्रयोग झाले.
संमेलनाचा समारोप महाराष्ट् राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पार पडला.

दहावे अ.भा. दलित नाट्य संमेलन, पवनी (भंडारा) २००१

या संमेलनात तीन परिसंवाद आणि छोट्या-मोठ्या वीस नाटकांचे प्रयोग झाले.

अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या काही अध्यक्षांची नावे

  1. भि.शि. शिंदे (१ ले, पुणे, १९८४)
  2. मधुसूदन गायकवाड (२रे संमेलन, अहमदनगर, १९८५)
  3. प्रा. दत्ता भगत (३रे, अंबेजोगाई, १९८६)
  4. प्रेमानंद गज्वी (चौथे अ.भा. दलित नाट्य संमेलन, नागपूर १९८८)
  5. प्रा. अविनाश डोळस (५ वे नाट्य संमेलन, जानेवारी १९९०, नांदेड)
  6. प्रा. रामनाथ चव्हाण (६ वे अ भा दलित नाट्य संमेलन)
  7. विजयकुमार गवई (सातवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, धुळे १९९३)
  8. प्रभाकर दुपारे (आठवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, चंद्रपूर १९९५)
  9. विठाबाई भाऊ मांग (९ वे संमेलन १९९६)
  10. दादाकांत धनविजय (दहावे अ.भा. दलित नाट्य संमेलन, पवनी (भंडारा) २००१)
  11. रुस्तुम अचलखांब (पिंपरी-चिंचवड, २००९)

संदर्भ