अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
Appearance
साचा:माहितीचौकट चित्रपट अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल यांविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रपटामुळे बुद्धाच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- अभिषेक उराडे – बुद्ध
- रवी पाटील – शुद्धोधन
- गीता आगरवाल – महाप्रजापती गौतमी
- मृणाल पेंढरकर – यशोधरा
- गौतम डेंगरे – आनंद भिक्खू
उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रवीण दामले यांनी दिग्दर्शन करून निर्नाण केलेला हा चित्रपट मनोज नंदवानाच्या जय विराट एंटरटेन्मेंट लिमिटेडने वितरित केला आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला.
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची